Pramod Susare

यशोगाथा व्यावसायिकाची – टाकाऊ वस्तूंपासून कसा उभारला जाऊ शकतो एक कोटीचा स्टार्टअप!

पुणे :  टाकाऊ वस्तूंपासून कसा उभारला जाऊ शकतो एक कोटीचा स्टार्टअप! ही गोष्ट आहे श्रीरामपूरचे मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या प्रमोद सुसरे यांची. एका MNC कंपनीत जॉब करत असतानाच त्यांनी स्वतःच काही तरी करण्याची इच्छा होती म्हणून जॉब करत असतानाच 2018 साली कमी भांडवला मध्ये स्वतःचा P2S International या नावाने स्टार्टअप सुरू केला. यामध्ये ते ड्रम, टायर, जुन्या गाड्या पासून हॉटेल, कॅफे, रेस्टॉरंट, बार, गार्डन यांचे फर्निचर तयार करतात. चला तर मग जाणून घेऊया कसा जुने टायर, ड्रम यांना वापरून 1 कोटींचा स्टार्टअप उभा केला – श्रीरामपूरच्या प्रमोद सुसरे याची यशोगाथा.

स्टार्टअपची सुरुवात कशी झाली?

पुण्यातील एका नामांकित कंपनी मध्ये मेंटेनन्स इंजिनीअर असलेल्या प्रमोद सुसरे यांना स्वतःच काही करायला पाहिजे हा विचार नेहमी सतावत होता. कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे नोकरी सोडणे प्रमोद यांच्यासाठी कठीण होते. फक्त 12000 रुपये असलेला पगारामधून प्रमोद काही पैसे घरी पाठवायचे आणि काही स्वखर्चासाठी ठेवायचे. नोकरीवरच घर चालत असल्यामुळे घरचे व्यवसायासाठी तयार नव्हते. शेवटी घरी न सांगता प्रमोद यांनी बिझनेस टाकायचं ठरवलं पण त्यासाठी भांडवल नव्हते. म्हणून कमी भांडवलामध्ये जो धंदा टाकत येईल असाच धंदा निवडायचं त्यांनी ठरवलं.

व्यवसायाची सुरुवात अशी झाली

जुन्या टायर पासून काही रचनात्मक करता येईल का यावर प्रमोद यांनी संशोधन सुरू केल. इंटरनेटवर व्यवसायाविषयी काही ब्लॉग वाचले. या व्यवसायातील पक्के ज्ञान मिळाल्यावर त्यांनी टायर पासून खुर्ची, टेबल बनवायचे मनाशी पक्के ठरवलं. 18 ऑक्टोबर 2018 रोजी एक शॉप भाड्याने घेतले आणि P2S International या नावाने सुरु केलेल्या स्टार्टअप (Furniture Business) मध्ये त्यांनी जुने टायर, ड्रम यांचा वापर करून त्यापासून आकर्षक टेबल, खुर्ची यांसारखे फर्निचर बनवले. प्रमोद यांनी हा व्यवसाय चालू केला पण सोबत नोकरीही चालू ठेवली. नोकरी अधिक स्वतःचा व्यवसाय असे एक वर्ष ते करत राहिले.

पहिली Furniture Business ऑर्डर

प्रमोद यांना पुणे मध्ये पहिली ऑर्डर मिळाली ती म्हणजे Cafe Pune Studio ची आणि ती त्यांनी ठरलेल्या वेळेत पूर्ण केली. दिवसभर काम करून रात्री शॉपवर काम करत असलेल्या प्रमोद यांना पहिल्या 3 महिन्यामध्ये फक्त 2 ऑर्डर मिळाल्या होत्या. हळूहळू ऑर्डर वाढत गेल्या.

रोजगार उपलब्ध केला

आज प्रमोद यांच्या P2S International या स्टार्टअप मध्ये एकूण 15 जण नोकरीवर आहेत. ते म्हणतात की, मला आनंद आहे की स्वतःचा व्यवसाय करत असताना मी सोबतच तरुण मुलांना रोजगार दिला.

किती ऑर्डर मिळतात?

आज प्रमोद यांना महिन्याला 10 ते 15 हॉटेल, कॅफे च्या ऑर्डर मिळतात. एक ऑर्डर 50 ते 1 लाख रुपये पर्यंत असते. या सर्व ऑर्डर पुणे, मुंबई, सातारा, नाशिक, अहमदनगर, सांगली या शहरातून तसेच चेन्नई, हैद्राबाद, गुजरात, दिल्ली, बेंगलोर या राज्याबाहेरील शहरातून देखील ऑर्डर मिळतात. प्रमोद यांच्या या व्यवसायाचा वार्षिक 90 ते 1 कोटी पर्यंत उलाढाल आहे आणि पुढच्या वर्षी 2 कोटी पर्यंत वार्षिक उलाढाल करण्याचा प्रमोद यांचा मानस आहे.

मार्च महिन्यामध्ये प्रमोद यांनी दक्षिण आफ्रिकेला पण ऑर्डर पाठवली ती त्यांची पहिली परदेशातील ऑर्डर होती. आता अमेरिका (United States of America), इंग्लंड मध्ये पण वेगवेगळया लोकांशी त्यांचे बोलणं चालू असून त्या ऑर्डर पण लवकरच फायनल होतील असा त्यांना विश्वास आहे.

– प्रमोद ज्ञानेश्वर सुसरे

P2S INTERNATIONAL FURNITURE WORLD Koregaon Bhima Nagar Pune highway.

http://www.p2sinternational.in

tel:9658635777