87 thousand 681 patients of Corona are undergoing treatment in the state - Health Minister Rajesh Tope

चांगली बातमी : राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५३ टक्क्यांवर

राज्यात आज कोरोनाच्या ५३१८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६७ हजार ६०० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज ४४३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८४ हजार २४५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.९४ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ९६ हजार ८७४ नमुन्यांपैकी १ लाख ५९ हजार १३३ नमुने पॉझिटिव्ह (१७.७४ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६५ हजार  १६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ८६ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.५७ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले ८६ मृत्यू हे मुंबई मनपा-४१, ठाणे मनपा-१,कल्याण-डोंबिवली मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-१, वसई-विरार मनपा-१, पनवेल मनपा-१, नाशिक-१. मालेगाव मनपा-१, धुळे-३, जळगाव-५, पुणे मनपा-१५, पिंपरी-चिंचवड मनपा-३, सोलापूर मनपा-१, सातारा-१, कोल्हापूर-१, सांगली-१, औरंगाबाद -१, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.