राज्यावर सध्या कोरोनाचे मोठे संकट आले आहे.राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात आता कोरोना रुग्णांची संख्या ही 50 हजारांच्या पर जाऊन पोहोचली आहे .
कोरोनाच्या या कालावधीमध्ये आता ठाकरे सरकारने केरळ सरकारकडे मदतीसाठी हाक दिली आहे. केरळमधील कोरोनाशी यशस्वीरीत्या लढा देणाऱ्या डॉक्टर,नर्स,या कोरोना योध्याना महाराष्ट्रात पाठवण्याची विनंती ठाकरे सरकारने केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य प्रशासन आपल्यापरीने सर्वतोपरी मेहनत करताना दिसून येत आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना यावेळी प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहेत.