There are strange laws in 'this' country

‘या’ देशात आहेत विचित्र कायदे कानून , वाचून व्हाल हैराण

भारताचा सख्खा शेजारी पाकिस्तान त्याच्या नापाक कृत्यांसाठी खूपच प्रसिद्ध आहे. या देशात असे विचित्र कायदे कानून आहेत ते ऐकून तुम्ही हैराण होऊन जाल. चला तर मग आपण या कायद्याबद्दल जाणून घेऊया.

आजकाल मोबाईलशिवाय कोणाच्याही दिवसाची सुरुवात होत नाही की दिवस मावळत नाही. पाकिस्तानामध्ये जर का तुम्ही दुसऱ्याच्या मोबाईलला चुकूनही हात लावलात तर त्यासाठी तुम्हाला ६ महिन्यासाठी जेल मध्ये जावे लागू शकते. तेव्हा तिकडे मोबाईलला हात लावताना जरा जपूनच.

पाकिस्तान आपल्या देशातल्या कोणत्याही माणसाला इस्त्राईल या देशामध्ये जाण्यासाठी व्हिजा देत नाही. पाकिस्तानी फॉरेन मिनिस्ट्रीच्या मते इस्त्राईल हा देश नाहीये.

जर का तुम्ही पाकिस्तानमध्ये शिकत असाल आणि तुमची शिक्षणाची फी २ लाखाहून अधिक झाली तर तुम्हाला पाकिस्तानी शासनाला ५% किंवा त्याहून अधिक टॅक्स भरावा लागतो.

या देशामध्ये जर का तुम्ही त्यांच्या पंतप्रधानांची चेष्टा मस्करी करताना चुकून जरी सापडलात तर तुमचं काही खरं नाही. तुम्हाला या साठी होणारी शिक्षा ही वेळोवेळी तिथल्या तुघलकांकडून बदलली जाते.

पाकिस्तानामध्ये लिव्ह इन रेलशनशिपला मान्यता नाहीये. तुम्ही लग्नाआधी एकत्र राहू शकत नाही.

रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये तुम्ही घराबाहेरची पदार्थ खाऊ शकत नाही. तुम्ही मुस्लिम नसलात तरी तुम्हाला हा नियम पाळावा लागतो. या काळात बाहेरचे पदार्थ खाऊन चालत नाही.

अल्लाह, मस्जिद,रसूल आणि नबी अशा शब्दांना इंग्रजीमध्ये भाषांतराची मनाई या देशामध्ये आहे.

एखादा वाह्यात मेसेज जर का तुम्ही पाकिस्तानामध्ये कोणाला सेंड केलात तर तुम्हाला १० लाखांपर्यंतचा दंड होऊ शकतो. 

पाकिस्तानमध्ये ट्रान्सजेंडर व्यक्ती आर्मी जॉईन करू शकत नाही. त्यांना बऱ्याचशा क्षेत्रामध्ये बंदी आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का पाकिस्तानामध्ये अशा लोकांची संख्या सर्वात जास्त आहे.