kirit-somaiya

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ किरीट सोमय्यांच्या रडारवर, हसन मुश्रीफ यांनी मोठ्या प्रमाणात घोटाळे केले, किरीट सोमय्यांचा दावा

किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे आपल्यासोबत असल्याचा दावा यावेळी केला 

कोल्हापूर – राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप पत्रकार परिषदेत केले. काल किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याचा भ्रष्टाचार उघडकीस असल्याचे जाहीर केले होते . त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केल्याचा गौप्यस्फोट सोमय्या यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी उद्या मंगळवारी ईडीमध्ये रितसर तक्रार नोंदवणार असून परवा केंद्रातील विविध तीन यंत्रणांना याबाबतचे 2700 पानांचे पुरावे देणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे.

सोमवारी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ते दोन नेते कोण? असा सवाल केला जात होता. त्यावरचा सस्पेन्स आज उठला. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले, तर शिवसेनेच्या मंत्र्याचा भ्रष्टाचार नंतर जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं.

किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार : हसन मुश्रीफ

केंद्रीय अर्थ मंत्रालयाला पुरावे देणार

हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाने  सरसेनानी संताजी धनाजी साखर कारखान्यामध्ये 100 कोटीहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा पार्क केला आहे. हे मी जबाबदारीने सांगत आहे. याबाबत उद्या मी मुंबई ईडीकडे अधिकृत तक्रार करणार आहे. 2700 पानांचे पुरावे देणार आहे. परवा दिल्लीला फायनान्स मिनिस्ट्री, ईडी, कंपनी मंत्रालय यांच्याकडेही हे सर्व पुरावे देणार आहे. ठाकरे सरकारची डर्टी इलेव्हन घोटाळ्यात राखीव खेळाडूंची भरती चालूच राहणार आहे. माझ्याकडे दोन मंत्र्याच्या फाईल तयार होत्या. आज एनसीपीच्या मंत्र्यांचा घोटाळा उघड केला. कालांतराने दुसऱ्या मंत्र्याचा घोटाळा उघड करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company