anil parab

एस टी कामगार संप आज होणार ‘मोठा निर्णय’

मुंबई : गेले अनेक दिवस सुरु असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज शासन निर्णय घेत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब(anil parab) यांनी बुधवारी केली आहे. . शासन नियुक्त समिती विलीनीकरणाबाबत निर्णय देईल मात्र त्याआधी सरकारने महत्त्वाचे पाऊल तत्काळ उचलून कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल ४१ टक्के वाढ करण्याची घोषणा परब यांनी जाहीर केली. मात्र, या निर्णयानंतरही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. संप मागे घेण्याबाबत कर्मचारी संघटना आज, गुरुवारी निर्णय जाहीर करणार आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपप्रकरणी सह्याद्री अतिथीगृह येथे अनिल परब, एसटीचे अधिकारी, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत व एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बुधवारी बैठक झाली. या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचे परब यांनी जाहीर केले. विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांना साधारण ४१ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ देण्यात येणार आहे. एसटीच्या पगारवाढीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे परब यांनी यावेळी सांगितले. याशिवाय वेळेवर वेतन, प्रोत्साहन भत्ता देण्याचे आश्वासनही शासनाने दिले. यामुळे महिन्याला ६० कोटी रुपये अतिरिक्त बोजा सरकारी तिजोरीवर पडेल. करोनाकाळात एसटीचे महामंडळाचे फार नुकसान झाले असून, या काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य शासनाने २ हजार ७०० कोटी रुपये मदत केली असल्याचे देखील परब यांनी स्पष्ट केले आहे.

Gadre Tea Company
Gadre Tea Company

मात्र या वेतनवाढीच्या निर्णयानेही एसटी कर्मचारी संघटनांचे समाधान झालेले नाही ते विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारच्या निर्णयाबाबत चर्चा करून गुरुवारी संपाबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे कर्मचारी संघटनांच्या प्रमुखांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
निलंबित केलेले कर्मचारी विलंब न करता कामावर हजर झाल्यास निलंबन रद्द केले जाईल. मात्र ते हजर झाले नाहीतर तर त्यांच्यावर कारवाई होईल, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून कामावर हजर व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
विलीनीकरणाबाबत शासनाने याआधीच भूमिका स्पष्ट केली असून त्यावर शासनाने नेमलेली समिती निर्णय घेईल. समितीचा अहवाल १२ आठवडय़ांत मिळणार आहे तोवर हा संप सुरू राहू नये, यासाठी वेतनवाढीचा निर्णय तत्काळ घेण्यात आला आहे. संपामुळे होणारे नुकसान एसटी महामंडळाला पर्यायाने कामगारांनाही परवडणारे नाही. संप मागे घेण्यात आला नाहीतर कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशाराही परब यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाडिक- पाटील गट आमने-सामनें

Follow us – 

ADVERTISEMENT –

Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation