viratab

… अन् विराट-एबीच्या अश्रूंचा फुटला बांध; पाहा भावनिक करणारा व्हिडीओ

दुबई-  शारजा क्रिकेट ग्राऊंडवर इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल २०२१) तेराव्या हंगामातील एलिमेनेटर सामना सोमवारी (११ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघात खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिलेले १३९ धावांचे आव्हान कोलकाताने अखेरच्या षटकात पार केले. या पराभवासह बेंगलोर संघ स्पर्धेतून बाहेर पडला. तसेच, हा सामना विराट कोहलीचा बेंगलोरसाठी कर्णधार म्हणून अखेरचा सामना ठरला. या सामन्यानंतर विराट व संघाचा प्रमुख फलंदाज एबी डिव्हिलियर्स भावूक झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अटीतटीच्या सामन्यात बेंगलोरचा पराभव
साखळी फेरीत तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या बेंगलोर व कोलकाता यांच्या दरम्यानच्या या सामन्यात बेंगलोरला अखेरच्या षटकात पराभव पाहावा लागला. फलंदाजांना आलेले अपयश व क्षेत्ररक्षकांनी मोक्याच्या वेळी दवडलेल्या संधी या साठी कारणीभूत ठरल्या. या पराभवामुळे विराट कोहलीच्या आयपीएलमधील नेतृत्व कारकीर्दीची पराभवाने सांगता झाली. विराटने स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आपला कर्णधार म्हणून हा अखेरचा हंगाम असेल असे स्पष्ट केले होते.

विराट-एबीला झाले अश्रू अनावर
सामन्यानंतर बेंगलोरचे खेळाडू चर्चा करत असताना अचानकपणे विराटला अश्रू अनावर झाले. त्याने हाताने ते अश्रू पुसत तसेच, डोळ्यांवर टोपी घेत ते अश्रू लपवण्याच्या प्रयत्न केला. विराटला भावूक झालेला पाहून एबी डिव्हिलियर्स देखील आपले अश्रू रोखू शकला नाही. या दोघांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अशी राहिली कोहलीची कर्णधार म्हणून कामगिरी
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून बेंगलोर संघाचा सदस्य असलेल्या विराट कोहलीने २०१३ मध्ये डॅनियल विटोरीच्या निवृत्तीनंतर बेंगलोरचा कर्णधार म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याच्या नेतृत्वात बेंगलोरने १७० सामने खेळले. त्यापैकी ६६ सामन्यात संघाला विजय तर, ७० सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. ४ सामन्यांचा मात्र निकाल लागू शकला नव्हता. विराटच्या नेतृत्वात संघाने २०१६ आयपीएलमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेली. तर, दोन वेळा त्यांना अखेरच्या स्थानी समाधान मानावे लागले.

रडणाऱ्या चिमुकीलाला धोनीकडून मिळाले सर्वात भारी गिफ्ट; तुम्ही पाहिलं का?

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company