virat kohli

अखेरच्या सामन्यात विराट कोहलीचा एक नवा विक्रम

पुणे : इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने २-१ अशा फरकाने जिंकुन इंग्लंडच्या संघाला रिकाम्या हातानी परत पाठवले आहे. या सामन्यात कर्णधार कोहली पुन्हा एकदा नाणेफेक हरला. मात्र त्याआधीच विराट कोहलीने(virat kohli) असा एक विक्रम आपल्या नावे केला आहे. या विक्रमाच्या यादीत कोहली जागतिक क्रिकेटमध्ये आठवा खेळाडू ठरला आहे.

इंग्लंडविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना हा विराट कोहलीचा कर्णधार म्हणून २००वा सामना ठरला आहे. अशी कामगीरी करणारा तो भाराताचा तिसराच कर्णधार बनला आहे. तर जगामध्ये तो आठवा क्रिकेटपटू ठरला आहे. या आधी भारताकडून अशी कामगीरी महेंद्रसिंह धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी केली होती. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीने सर्वात जास्त ३३२ सामन्यात कर्णधारपद भुषवले आहे. त्यापैकी १७८ सामन्यात विजय तर १२० सामन्यात पराभव स्विकारला आहे. तर मोहम्मद अझरुद्दीनने २२१ सामन्यात कर्णधारपद भुषवताना १०४ सामन्यात विजय संपादन केला आहे.

तर कोहलीने २०० सामन्यात १२८ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर ५५ सामन्यात पराभव स्विकारला आहे. जागतीक क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात कर्णधारपद भुषवण्याचा विक्रम हा धोनीच्या नावे आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलीयाचा रिकी पॉन्टिंग आहे. पॉन्टिंगने ३२४ सामन्यात कर्णधारपद भुषवले आहे. तर न्युझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंगने ३०३ सामन्यात कर्णधारपद भुषवले आहे. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ (२८६), ऑस्ट्रेलीयाच्या एलन बॉर्डर (२७१), श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा(२४९) यांचा नंबर लागतो.