kolhapur election

राजलक्ष्मीनगरमध्ये भाजपकडून कोणाला मिळणार संधी

कोल्हापूर –

कोल्हापूर महापालिकेचा राजलक्ष्मीनगर प्रभाग क्र ७० सर्वसाधारण झाल्याने याठिकाणी प्रचंड चुरस निर्माण झाली असून राजलक्ष्मीनगरची जनता कोणाला आशीर्वाद देणार पारंपरिक उमेदवार की नवीन चेहऱ्याला पसंती याची उत्सुकता लागून राहिली आहे. राजलक्ष्मीनगर हा प्रभाग कोल्हापूर दक्षिणचा महत्वपूर्ण प्रभाग असल्याने पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप नेते मा.खासदार धनंजय महाडिक त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचीच असणार आहे. या मतदारसंघातील लढत हि कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातच होणार असून विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचे अंदाज बांधणे खूप घाईचे ठरणार आहे.
भाजपचा जवळपास १००० मतदारांचा गठ्ठा असणाऱ्या राजलक्ष्मीनगरात भाजपच्या तिकिटासाठी उमेदवारांची रांग लागली आहे. मागील महापालिका निवडणुकीत शोभा बामणे यांचा अंतर्गत नाराजीमुळे आणि स्व. दिलीप मगदूम यांच्या निधनामुळे तयार झालेल्या सहानुभूती मुळे निसटता पराभव झाला, त्यामुळे भाजप यावेळी कोणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप कडून उमेदवारी मिळवण्यासाठी रमेश चावरे, राजेश कोगनुळीकर, प्रसन्ना पडवळे तसेच मूळचे शिवसैनिक असणारे सुधीर राणे प्रयत्न करत आहेत.

महाडिक कुटुंबाच्या जवळचे असणारे रमेश चावरे यांनी मागील १५ वर्षापासून या मतदारसंघातून तयारी केली असून, २०१५ च्या निवडणुकीत ते आपली पत्नी वर्षा चावरे यांच्यासाठी आग्रही होते. पण महाडिक कुटुंबियांच्या शब्दाला मान देत त्यांनी त्या निवडणुकीतून माघार घेतली. माघार घेतल्यानंतर ते निवडणुकीतून अलिप्त राहिले त्याचाच फटका भाजपला बसला अस बोलले जात आहे. मागील १५ वर्षापासून त्यांनी लोकाभिमुख कामं केली आहेत, माजी आमदार अमल महाडिक आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून त्यांनी प्रभागातील बरीच विकासकामे केली आहेत. २०१९ चा महापूरात त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना मदत केली तसेच कोरोना काळात केलेले धान्यवाटप, प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी इम्यूनीटी डोसचे वाटप यामुळे त्यांच्याविषयी एक सहानुभूती तयार झाली आहे.
मुळचे शिवसैनिक असलेले सुधीर राणे यांनी देखील भाजपकडून तिकीट मागितले आहे, ते देखील सामाजिक कामाच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात असतात. सुधीर राणे हे निवडणूक लढवणार हे निश्चित आहे, भाजपचा एकगठ्ठा मतदान या प्रभागात असल्यामुळे त्यांनी भाजपकडून तिकीट मागितले आहे. भाजपकडून तिकीट मिळाले नाही तरी ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार हे निश्चित.

राजेश कोगनुळीकर आणि प्रसन्ना पडवळे यांनी देखील भाजपकडून उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते आणि संभाव्य बंडखोरी भाजप कशा प्रकारे टाळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे