गगनबावडा तालुकावासियांच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीस शेणी प्रदान

गगनबावडा : 
गगनबावडा तालुकावासियांच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीस शेणी प्रदान
मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर 2020 रोजी पंचगंगा स्मशानभूमी कोल्हापूर येथे गगनबावडा तालुकावासियांच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीस 15 हजार शेणी व लाकडे प्रदान करण्यात आली.
कोल्हापुरातील कोरोना योद्धे बैतूलमाल कमिटीचे जाफराबाद सय्यद,आरोग्यमित्र बंटी सावंत,व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे,शाहीरविशारद डॉ.आझाद नायकवडी,संताजी बाबा घोरपडे यांच्या हस्ते कोल्हापूरच्या महापौर मा. निलोफर आजरेकर व कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मा.डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी साहेब यांच्याकडे या शेणी प्रदान केल्या.
सामाजिक कार्यकर्ते माजी पंचायत सभापती बंकट थोडगे,संदीप पाटील, शिवाजी राऊत तसेच सरपंच संघटना गगनबावडा तालुका यांच्या संयोजनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला गेला. विशेष बाब म्हणजे माजी सभापती बंकट थोडगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अवघ्या एका दिवसामध्ये तालुक्यातील माता-भगिनीनी जवळजवळ पंधरा हजार शेणी आणि लाकडे गोळा करून माजी सभापती बंकट थोडगे यांच्याकडे सुपुर्द केल्या.
कोरोना काळात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या ज्ञात-अज्ञात बंधू-भगिनींना श्रद्धांजली अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी बोलताना म्हणाले ‘आजपर्यंत अनेक सामाजिक संस्थांनी शेणी आणून दिल्या. पण आज गगनबावडा तालुक्याच्या प्रत्येक घरातून आलेल्या या शेणी कोल्हापूर महानगरपालिकेला आणून दिल्याबद्दल महानगरपालिका गगनबावडा तालुका वासियांची ऋणी राहील असे गौरवोद्गार काढले.
यावेळी बाळासाहेब कांबळे,अमर वाईंगडे,विशाल मगदूम,रघुनाथ पाटील,स्वराज नायकवडी उपस्थित होते.
गगनबावडा तालुक्यातील टेम्पोचालक युवराज पाटील,संभाजी पाटील, यशवंत मोहिते,संजय नाईक यांनी या सामाजिक कार्यासाठी विनामूल्य वाहनसेवा उपलब्ध करून दिली.