You will be shocked to read this strange practice of the first night of marriage!

लग्नाच्या पहिल्या रात्रीची ‘ही’ विचित्र प्रथा वाचून हादरून जाल !

आजकाल लग्न म्हणजे एक मोठा इव्हेंट झाला आहे. पूर्वीच्या काळी लग्न म्हणजे एक साधा घरगुती कार्यक्रम होत असे,मात्र आताच्या जमान्यात लग्न होण्यापूर्वीचे फोटोशूट ते लग्नानंतर नवरा बायकोने कुठेतरी फिरायला जाणे असा फार मोठा सोहळा झाला आहे.आजकाल  लग्न करताना लग्न सोहळा पार पाडण्यासाठी  इव्हेंट मॅनेजरची गरज लागू लागली आहे. अशा या सोहळ्याने जरी त्याचे रूप बदलले असले तरी नवरा नवरीच्या लग्नप्रतीच्या तसेच एकमेकांसाठीच्या भावना त्याच आहेत.लग्नानंतरची असणारी पहिली रात्र आणि तिच्याबद्दलच्या प्रथा या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या आहेत.

 

 

बंगाल मध्ये तर आपल्याला या रात्रीची वेगळीच प्रथा पाहायला मिळते. लग्नानंतरच्या पहिल्या रात्री या नवीन जोडप्याला एकत्र राहत येत नाही. बंगालमध्ये रात्रीला काळरात्र म्हणतात. इथल्या लोकांच्या मते हि रात्र अशुभ असते. या रात्रीला अशुभ म्हणण्यामागे तिथले स्थानिक लोक एक कथा ऐकवतात , ‘ सर्पदेवता मनसा हि शंकराची मुलगी असते मात्र तिची इतर देवी देवतांप्रमाणे पूजा अर्चा होत नसते. एक दिवस ती चिडून एका व्यापारी माणसाला गाठते आणि स्वतःची पूजा करण्याबद्दल सारे काही सांगते मात्र त्या बिचाऱ्या व्यापाऱ्याला हिच्याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे तो पूजा करण्यास नकार देतो.

 

त्याच्या नाकारामुळे संतापून मनसा त्याला शाप देते की , ‘ तुझ्या मुलांच्या लग्नानंतर त्या नवविवाहित जोडप्याने पहिली रात्र एकत्र घालवली तर त्यांचा मृत्यू होईल.’ काळाच्या ओघात व्यापारी हि गोष्ट विसरून जातो . मात्र जेव्हा त्यांच्या मुलाचे लग्न होऊन ते दोघेजण पहिली रात्र एकत्र घालवतात त्या दोघांचाही सर्प दंशाने मृत्यू होतो. त्या वेळी त्या व्यापाऱ्याला मनसाचे बोल आठवतात आणि तो तिची पूजा-अर्चा करून तिला प्रसन्न करून घेतो ‘.या प्रचलित दंतकथेमुळे बंगालमधील नवविवाहित जोडप्याला त्यांच्या लग्नानंतरची पहिली रात्र एकत्र घालवता येत नाही. लोकांच्या मते जर का त्यांनी ती रात्र एकत्र घालवली तर मनसा देवीच्या शापामुळे या जोडप्याचा सर्प दंशाने मृत्यू होऊ शकतो.