आपल्या 'या' वाईट सवयी आरोग्यासाठी नक्कीच ठरतात चांगल्या !

आपल्या ‘या’ वाईट सवयी आरोग्यासाठी नक्कीच ठरतात चांगल्या !

आपल्या सर्वांना अनेक सवयी असतात. त्या चांगल्या आहेत वाईट हे आपल्यापेक्षा इतर लोक जास्त ठरवतात . आपल्यापैकी काही जणांना बोटं चावणे,नखे खाणे आशा अनेक सवयी असतात मात्र इतरलोक या सवयी कशा वाईट आहे हे आपल्याला वारंवार  सांगतात मात्र याच वाईट सवयी आपल्यासाठी कशा फायदेशीर आहे हे आज तुम्हाला सांगणार आहे.

  • सतत नख खाणे 

   सतत नख खाल्ल्यामुळे आपल्या पोटात घाण जाते आणि पोटदुखी ,अल्सर यांसारखे पोटाचे आजार होतात. मात्र काही इतर शास्त्रज्ञाच्या मते नख खाण्याच्या सवयीमुळे शरीराची इम्युनिटी वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. 

  • जंकफूड –

जंकफूड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात चविष्ट,चमचमीत पदार्थ! हे पदार्थ खाणे कधीही वाईटच ! मात्र जंकफूड खाल्ल्यामुळे आपल्याला खूपसारे आजार होतात.मात्र काही इतर शास्त्रज्ञाच्या मते पास्ता हा पदार्थ असा आहे की याच्या सेवनाने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. 

  • आईस्क्रीम खाणे –

आपल्यापैकी खूप लोक असतील ज्यांना आईस्क्रिम खयाल आवडत नसेल.मात्र अनेक जण असे आहेत जे आईस्क्रीमचे अटी सेवन करतात. लोकांच्या मते हि सवय वाईट आहे. यामुळे तुमचे दात किडू शकतात. तुम्हाला डायबीटीस सारखा आजार होऊ शकतो मात्र तुम्हाला माहित आहे का आईस्क्रिमच्या सेवनाने तुम्हाला आलेला ताण तणाव कमी होण्यास मदत होते. आईस्क्रिममधील विशेष पदार्थ तुमच्या मेंदूला शांत करण्यास मदत करते.यामुळे तुमच्या झोपेची समस्यासुद्धा दूर होते. गाढ झोप लागण्यास मदत होते.

  • धावणे-

काहींच्या मते धावल्यामुळे तुमच्या शरीराला त्रास होतो. आणि तुमचे आरोग्य ढासळते. मात्र रोजच्या धावण्याची सवयीमुळे तुमचे आरोग्य उत्तम राहते. तुमच्या अंगाला ऊर्जा मिळते आणि तुमचं शरीर फ्रेश राहते.