abitkar-awade

KDCC Result :आवाडेंचा ‘करेक्ट कार्यक्रम’,आबिटकर विजयी

कोल्हापूर – जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या नागरी बँक-पतसंस्था गटात विरोधी गटाचे उमेदवार व प्रा.अर्जुन आबिटकर (Prakashrao Abitkar) यांनी एकतर्फी विजय मिळवत या गटातील सत्तारूढ गटाचे उमेदवार आमदार प्रकाश आवाडे(Prakash Awade)यांना धक्का दिला. या गटात आवाडे यांचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची चर्चा आहे. या गटातील विद्यमान संचालक अनिल पाटील यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. या गटातून श्री. आबिटकर हे ‘जायंट किलर’ ठरले, त्यांनी श्री. आवाडे यांच्यासह सत्तारूढ गटाच्या नेत्यांनाच एकप्रकारे धोबीपछाड दिल्याचे बोलले जाते. (abitkar-awade)

Gadre Tea Company
Gadre Tea Company

या गटातून विजयाची खात्री असल्याने श्री. आवाडे यांनी कालच फेसबुक पोस्ट टाकून गुलाल उधळायला बंगल्यावर या असा संदेश व्हायरल केल्याची चर्चा होती. पण त्यांचा या गटात दारूण पराभव झाला. दरम्यान या पराभवानंतर आवाडे समर्थकांकडून एक पोस्ट समाज माध्यमांवर फिरवली जात असून आघाडीच्या प्रमुख २ नेत्यांनीच आवाडे यांचा ठरवून कार्यक्रम केला असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.

आबिटकर यांना ६१४ तर श्री. आवाडे यांना ४६१ मते मिळाली. अनिल पाटील यांना १०६ मते पडली. या गटातील १२२१ मतदारांपैकी १२०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या गटातून सत्तारूढ आघाडीतून उमेदवारी मिळावी यासाठी आबिटकर यांचे प्रयत्न सुरू होते, पण त्यांना डावलून सत्तारूढ गटाने आवाडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या श्री. आबिटकर यांनी प्रा. मंडलिक यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या पॅनेलमधून उमेदवारी मिळवली व एकतर्फी विजय मिळवून मुश्रीफ यांच्यासह सत्तारूढ गटाच्या नेत्यांना एकच धक्का दिला.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निकालानंतर सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर

KDCC Bank Result : कोल्हापूर जिल्हा बँकेवर ‘सत्ताधारी’ आघाडी’चं वर्चस्व; दिग्गजांसह विद्यमान संचालक पराभूत

Follow us – 

ADVERTISEMENT –

Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation