England Players

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा; ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान

चेन्नई :  भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. चेन्नईच्या चेपक मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंच्या संघाने पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र भारतीय संघ 197 धावाच करू शकल्यामुळे टीम इंडियाला तब्बल 227 धावांनी हार पत्करावी लागली. या विजयासोबतच इंग्लंडच्या संघाने मालिकेत 1–0 अशी आघाडी मिळवली आहे.

या मालिकेतील पुढील दुसरा कसोटी सामना शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी आज (१२ फेब्रुवारी) इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. या संघातून जोफ्रा आर्चरसह ४ प्रमुख खेळाडूंना बाहेर करण्यात आले आहे. त्यांच्याजागी ४ नव्या खेळाडूंना संघात सहभागी करण्यात आले आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ – डोमिनिक सिब्ली, रॉरी बर्न्स, डॅनियल लॉरेन्स, बेन स्टोक्स, जो रूट (कर्णधार), ऑली पोप, बेन फोक्स (यष्टीरक्षक), मोईन अली, जॅक लीच, ख्रिस वोक्स, ऑली स्टोन, स्टुअर्ट ब्रॉड