rishabh-pant

‘रिषभ पंतसाठी ही मोठी संधी’ – रिकी पॉटिंग

मुंबई : ९ एप्रिल पासुन आयपीएलचे नवे सत्र सुरु होणार असून, यंदाच्या सत्रातील पहिला सामना हा रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये ९ एप्रिल रोजी होणार आहे.

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने या मोसमासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. श्रेयस अय्यर ऐवजी रिषभ पंतवर  संघाच्या कर्णधापदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही रिषभ पंतसाठी मोठी संधी असल्याचं दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉटिंगने म्हटलं आहे.

‘रिषभ पंतमध्ये भरपूर क्षमता आहे. तो संघाचं नेतृत्व करु शकतो. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने आम्ही रिषभवर संघाच्या नेतृत्वाची जाबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे’ असं रिकी पॉन्टिंगने सांगितलं.

आताच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध रिषभ पंतने बहारदार कामगिरी केली. युवा फलंदाज रिषभ पंतसाठी ही मोठी संधी आहे. याच्यात कोणतीच शंका नाही की कप्तानी करताना त्यांचं मनोबल नक्की वाढेल. त्याच्यासोबत कोचिंग करायला मी उत्सुक देखील आहे. आम्ही आयपीएलसाठी उत्सुक आहोत आणि वाट पाहत आहोत, असं रिकी पॉटिंग म्हणाला.