Sangli District Bank Election

Sangli District Bank Election – सांगली जिल्हा बँकेत भाजपचे राहुल महाडिक विजयी; महाविकास आघाडीला धक्का

सांगली – जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत बँक-पतसंस्था गटात भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलच्या राहूल महाडिक यांनी महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. (Sangli District Bank Election) त्यांनी राष्ट्रवादीचे नेते किरण लाड यांचा पराभव करत बँकेत एंट्री केली आहे.  या लढतीबद्दल जिल्हाभर उत्सुकता होती. (DCC Bank Election)

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या  (Sangli District Bank Election results) निवडणुकीत पहिल्यांदाच पॅनेल लावून लढत असलेल्या भाजपने ४ जागांवर विजय मिळवत चांगली कामगिरी नोंदवली आहे. (Sangli DCC Bank) महाडिक यांचा बँक, पतसंस्था गटातील विजय जवळपास निश्‍चित मानला जात होता. ते नेमका कुणाला धक्का देणार, याबाबत चर्चा होती. त्यांनी बँक, पतसंस्था गटातून बाजी मारत जिल्हा बँकेत प्रवेश केला आहे.

Healing Hands
Healing Hands

अमल महाडिक कोल्हापुरातून विधानपरिषदेच्या रिंगणात

भाजपमध्ये असलेला महाडिक गट हा कोल्हापूर,सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील एक महत्वाचा गट आहे. राहुल महाडिक यांचा विजय महाडिक गटासाठी नवसंजीवनी असून त्यांचे चुलत बंधू अमल महाडिक हे कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपकडून निवडणूक रिंगणात आहेत. अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी पक्षाच्या ताकदीसोबतच महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक, शौमिका महाडिक, पृथ्वीराज महाडिक यांनी देखील जोरदार यंत्रणा लावली आहे.  कोल्हापूर विधानपरिषदेची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली असून जनसुराज्यचे आमदार कोरे आणि आमदार आवाडे यांचा पाठींबा मिळवण्यात भाजप यशस्वी झाला आहे.

राहुल महाडिक यांच्यापासून चालू झालेली विजयी घोडदौड अमल महाडिक विधानपरिषद निवडणुकीत कायम ठेवतात का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

पालकमंत्र्यांच्या व्यासपीठावर असलेले लोकच त्यांचा कार्यक्रम करतील – धनंजय महाडिक

राजू शेट्टी यांनी दिला साखर कारखाने बंद करण्याचा इशारा

Follow us – 

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company