bjp rahul mahadik

भाजपच्या राहुल महाडिक यांच्याकडून जयंत पाटलांचा “करेक्ट कार्यक्रम”

सांगली –  भाजप पक्षाच्या भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक (bjp rahul mahadik) सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत.  राहुल महाडिक हे महाडिक कुटुंबातील पहिले सदस्य आहेत जे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळात आले आहेत. ते बँका-पतसंस्था गटातून चांगल्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे बंधू किरण लाड यांना पराभूत करत महाडिक यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांना महाडिक यांचा विजय धक्का देणारा असून महाडिक गटाला बळ देणारा आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाला डावलून महाविकास आघाडीकडून पॅनेल तयार करण्यात आले होते. या निवडणूकीत वाळवा तालुक्यातून बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, ॲड. चिमण डांगे, वैभव शिंदे, राहुल महाडिक, सी. बी. पाटील, भानूदास मोटे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोसायटी गटात राष्ट्रवादीकडून एकतर्फी लढत होणार होती. तर बँका, पतसंस्था गटातून राहुल महाडिक यांनी अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल केल्यापासूनच महाडिक समर्थकांनी ‘महाडिक गट विषय कट’ अशी ललकारी देतच राहुल महाडिक यांचा विजय पक्का केला होता.
महाडिक यांनी बँका-पतसंस्था गटात अर्ज दाखल केल्यापासून जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील मतदारांच्या बरोबर वैयक्तीक पातळीवर संपर्क साधण्याचे काम युद्धपातळीवर चालू केले होते. प्रचारासाठी सर्व यंत्रणा अहोरात्र कामाला लागल्या होत्या. पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे बंधू किरण लाड यांना पराभूत करत महाडिक यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. तसे पाहता बँका-पतसंस्था गटात राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस यांचेच एकहाती वर्चस्व असताना देखील राहुल महाडिक यांनी आपले जिल्हाभर पसरलेले कार्यकर्ते व वैयक्तीक संपर्काच्या जोरावर ही विजयश्री खेचून आणली.

Gadre Tea Company
Gadre Tea Company

या निवडणूकीमुळे वाळवा तालुक्यात महाडिक गटाचे नवे अस्तित्व निर्माण झाले असून जिल्हा बँकेत प्रथमच महाडिकांचा हा नवा आवाज घुमणार आहे. राहुल महाडिक यांच्या विजयासाठी त्यांचे बंधू सम्राट महाडिक, इस्लामपूरचे माजी नगरसेवक कपील ओसवाल, नगरसेवक अमीत ओसवाल यांनी प्रचारामध्ये कोणीतीही कसर सोडली नाही तर या निवडणूकीमुळे तोंडावर असलेल्या जिल्हा परिषद व इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणूकीत महाडिक गट राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवणारी ठरेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

शरद पवारांचा फोन, तरीही शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव; हे घडले कसे?; राजकीय वर्तुळात चर्चा

Sangli District Bank Election – सांगली जिल्हा बँकेत भाजपचे राहुल महाडिक विजयी; महाविकास आघाडीला धक्का

Follow us – 

ADVERTISEMENT –

Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation