somaiyya-mushrif

सोमय्यांचा मुश्रीफांना दणका; राजीनाम्याची केली मागणी

ग्रामविकास खात्याला जयोस्तुते मॅनेजमेंटला दिलेले कंत्राट रद्द करावे लागल्याने त्यात घोटाळा झाल्याचे सत्य समोर आले आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. कोरोन काळात मंत्रालय पूर्णपणे बंद असताना शरद पवारांचे सहकारी १५०० कोटी रुपयांचा ढपला पाडला आहे, असा आरोप त्यांनी केला शिवाय मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची देखील मागणी यावेळी केली.
एवढ नव्हे तर हसन मुश्रीफ यांच्या जावयाला दिले गलेले 1 हजार 500 कोटीचं कंत्राट अखेर रद्द करण्यात आल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं.
राज्यातील ग्रामपंचायतींचा TDS रिटर्न भरण्यासाठी पुढील 10 वर्षासाठी हे कंत्राट दिलं गेलं होतं ते त्यांच्या जावयाने कंत्राट घेतले होते. आता ठाकरे सरकारनं हे कंत्राट रद्द केलं आहे ठाकरे सरकार हेच मुळात भ्रष्टाचारी सरकार आहे हे पुन्हा दिसत आहे, असा दावा केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री सध्या चौकशी करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय मंत्री पदाचा वापर करून बोगस कंपनी स्थापन करून अजित पवार यांनी बरीच माया गोळा केली आहे याचे पुरावे दाखवले आहेत त्यावर देखील बोलावं, अस आव्हान सोमय्या यांनी शरद पवार आणि अजित पवार यांना दिल आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ किरीट सोमय्यांच्या रडारवर, हसन मुश्रीफ यांनी मोठ्या प्रमाणात घोटाळे केले, किरीट सोमय्यांचा दावा

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company