dravid-dhoni

“मेंटर धोनी आणि प्रशिक्षक राहुल द्रविड भारतीय संघाला वेगळ्या उंचीवर नेतील”

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्वतः टी२० विश्वचषक स्पर्धा प्रशिक्षक म्हणून आपली अखेरची स्पर्धा असेल असे जाहीर केले होते. त्यामुळे, भारताचे भविष्यातील प्रशिक्षक कोण असतील याबाबत चर्चा सुरू आहे. भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे व दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांची या पदासाठी वर्णी लागू शकते अशी चर्चा होती. त्याचवेळी निवड समितीचे माजी अध्यक्ष राहिलेल्या एमएसके प्रसाद यांनी आणखी दोन नावांना आपला पाठिंबा दिला आहे.

हे असावे प्रशिक्षक आणि मेंटर
भारतीय संघाचे निवड समितीचे अध्यक्ष राहिलेले एमएसके प्रसाद यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की,
“रवि भाई नंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडने काम करावे. तसेच, एमएस धोनी याने त्याच्यासोबत मेंटर म्हणून काम केल्यास भारतीय संघ एका वेगळ्या उंचीवर पोहोचेल. हे दोघेही अत्यंत शांत व संयमी आहेत. तसेच, प्रत्येक जण त्यांचा आदर करतो. दोघांच्याही अनुभवाचा संघाला निश्चित फायदा होईल. या संघातील बरेचसे खेळाडू राहुलने तयार केले आहेत. तसेच अनेकांना धोनीसह खेळण्याचा अनुभव देखील आहे.”
प्रसाद हे २०१७ ते २०२० या कालावधीत भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष होते. अनेकदा आपल्या काही वक्तव्यांमुळे त्यांना टिकेचा ही सामना करावा लागला होता.

धोनी संघाचा मेंटर
आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) धोनीला मेंटर म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असून, अजूनही आयपीएलमध्ये चेन्नईचे नेतृत्व करतो. दुसरीकडे, राहुल द्रविडला क्रिकेट प्रशिक्षणाचा भरपूर अनुभव आहे. आयपीएल, एकोणीस वर्षाखालील भारतीय संघ, भारत अ आणि भारतीय वरिष्ठ संघ अशा विविध संघांचे प्रशिक्षक म्हणून त्याने काम पाहिले आहे.

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company