sanjay raut

‘दम मारो दम’, कमी प्रतिचा गांजा आणि विरोधकांची वायफळ बडबड – संजय राऊत

मुंबई : प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही शिवसेनेचा दसरा मेळावा संपन्न झाला, खास ठाकरी शैलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात आपल्या भाषणातून भाजपवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदा घेऊन ही टीका खोडून काढण्याचा प्रयत्न केला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे? असा प्रश्न उपस्थित केला होता.

त्यावर आज सामनातील अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू असं म्हणणारे स्वत:च मुख्यमंत्री बनले या विरोधकांच्या टीकेला संजय राऊतांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे. प्रश्न विचारणाऱ्याला ते संपवतात. घटना, कायदा त्यांना मान्य नाही. विरोधी पक्षातला मुख्यमंत्री ते स्वीकारत नाहीत. कमी प्रतीचा गांजा घेतल्यानेच  विरोधकांना  अशा प्रकारच्या कल्पना सुचतात, अशी टीका राऊतांनी सामनातील अग्रलेखातून भाजपवर केली आहे.

भाजप व त्यांचे केंद्रातले सरकार कोणत्याही प्रश्नांना सामोरे जात नाहीत. प्रश्न विचारणाऱ्यांना ते खतम करतात. लोकशाही, घटना, कायदा त्यांना मान्य नाही. उद्धव ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरुन ‘दम मारो दम’ करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरुन स्पष्ट होते.

उद्धव ठाकरे हे शिवसैनिकच आहेत आणि कोणी परकीय राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत. ते कोणत्या परिस्थितीत मुख्यमंत्री बनले याचं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी वाजत गाजत लाखो लोकांच्या उपस्थितीत शपथ घेतली. लोक झोपेत आणि गुंगीत असताना लपून छपून शपथ घेतली नाही.’ असा टोला शिवसेनेनं लगावला.

एकरकमी एफआरपीसाठी जयसिंगपूरमध्ये होणार स्वाभिमानीची ऊस परिषद, राजू शेट्टी आक्रमक

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company