विधान परिषद निवडणूकीच्या निमित्ताने कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले

कोल्हापूर : कोल्हापुरसह राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. कोल्हापुरमध्ये विद्यमान पालकमंत्री सतेज पाटील हे सध्या या जागेवर आमदार आहेत. या निवडणुकीसाठी १६ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होईल. विधान परिषद निवडणूकीच्या निमित्ताने कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले

विधान परिषदेवरील सहा वर्षाची मुदत १ जानेवारी २०२२ रोजी संपणार आहे. महापालिकेचे सभागृह अस्तित्त्वात नसल्याने व जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांतील विद्यमान नगरसेवकांची मुदत १५ डिसेंबर रोजी संपत असल्याने विधान परिषदेची निवडणुकही पुढे जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु आज आयोगाने या निवडणुकीचा कर्यक्रम जाहीर केल्याने जिल्ह्यातील राजकीय घडमोडींना लवकरच वेग येईल.

या निवडणुकीसाठी कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक मतदार नसून जिल्ह्यातील जुन्या नऊ नगरपालिकांतील विद्यमान नगरसेवकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत या सहा जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे व जिल्ह्यात १४ नगरपालिका, १२ पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषदेचे ६५ सदस्य हे या निवडणुकीचे मतदार असणार आहेत.

पालकमंत्री पाटील काँग्रेसच्या चिन्हावर गेल्या निवडणुकीत विजयी झाले, यावेळी ते महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. भाजपाकडून सतेज पाटील यांच्या विरोधात कोण असणार याविषयीची उत्सुकता आहे. धनंजय महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी दिवाळीच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रमुख नेते, नगरसेवक, जि.प. सदस्य यांची भेट घेण्याचा धडाका लावला होता त्यामुळे माजी आमदार महादेवराव महाडीक किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीतरी उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निवडणुकीचा कार्यक्रम खालील प्रमाणे
• १६ ते २३ नोव्हेंबर – उमेदवारी अर्ज दाखल करणे
• २४ नोव्हेंबर – उमेदवारी अर्जाची छाननी
• २६ नोव्हेंबर – उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस
• १० डिसेंबर – मतदान
• १४ डिसेंबर – मतमोजणी

Follow us – 

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company