Chandrakant Jadhav Anna

कोरोना योद्धाचा सन्मान करा : आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर – कोरोनाच्या काळात वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका, पोलीस कर्मचारी अनेकांनी आपल्या जिवावर बेतुन कर्तव्य बजावले आहे. या सर्व कोरोना योद्धाचा सन्मान करावा असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले आहे.
कोरोनाच्या महामारीत गेल्या वर्षापासून पोलीस प्रशासन, आरोग्य विभागातील सर्वच अधिकारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, प्रशासकीय अधिकारी व महसुल कर्मचारी वर्गाने आपल्या जीवाची पर्वा न करता उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत विविध संस्थांनी त्यांना कोवीड-१९ योध्दा म्हणून सन्मान केले आहे ; मात्र कोरोना दुसऱ्या लाटेच्या काळात काही ठिकाणी आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांच्यावर हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. या घटना निषद्यार्थ आहेत. डॉक्टरांना आपल्याकडे देवाचा दर्जा दिला जातो परंतु ते देव नसून मनुष्यच आहेत. हे सर्व नागरिकांनी समजून घ्यायला हवे. त्यामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका, पोलीस कर्मचारी या कोवीड योध्दावर हल्ले होणे निंदणीयबाब आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी कोरोना योद्धाना समजून घेऊन, त्यांचा सन्मान करावा व त्यांच्यावर हल्ला किंवा मारहाण करू नका. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास, नागरिकांनी त्याबाबत प्रशासनाकडे दाद मागावी अथवा थेट माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा ; मात्र कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.

आमदार चंद्रकांत जाधव यांचे मदत कक्ष पुन्हा सुरू