kdcc election

शिंदे यांच्यासाठी मुश्रीफ,पी.एन.,मंडलिक आग्रही

जिल्हा बँक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांनी कसली कंबर

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टिने नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. यासंदर्भात शुक्रवारी  सर्व नेत्यांची सायंकाळी बैठक होणार आहे. याचदिवशी सकाळी काँग्रेसकडून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुरुवारी (दि. १६) इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच नेते प्रयत्न करत आहेत. बहुतांशी तालुक्यातील निवडी बिनविरोध झाल्या असल्या तरी आजरा, भुदरगड, हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील निर्णय अद्याप झालेले नाहीत.महिला प्रतिनिधी, अनुसूचित जाती – जमाती, ओबीसी, कृषी पणन संस्था, नागरी बँका व पतसंस्था आणि इतर शेती संस्था या गटातील ९ जागांवरील उमेदवारीवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी नेत्यांची बैठक होणार आहे. बैठकीस पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आ. विनय कोरे, खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आवाडे आदी उपस्थित राहणार आहेत.

महिला गटातून गटातून पी. जी. शिंदे यांच्या पत्नी सौ. शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पी. जी. शिंदे हे ५ वर्षांचा कालावधी वगळता गेली २० वर्षे जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व करतात. भाजपमध्ये असूनसुद्धा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला निर्णायक पाठींबा आमदार पी.एन.पाटील यांना जाहीर केला होता. त्यांच्या या निर्णयामुळे गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यातून मताधिक्य मिळवण्यात आमदार पी.एन.पाटील यशस्वी झाले. दरवेळी संस्था गटातून निवडणूक लढवणाऱ्या पी.जी.शिंदे यांनी यावेळी आपला अर्ज न भरल्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील सर्वात प्रथम बिनविरोध निवडून आले. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत पी.जी.शिंदे यांनी आ. पी. एन. पाटील यांच्याकडे महिला गटातून पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे. स्वतः आमदार पी.एन.पाटील पी.जी.शिंदे यांच्यासाठी आग्रही आहेत.

Gadre Tea Company
Gadre Tea Company

मुश्रीफ व मंडलिक देखील आग्रही

ग्रामविकास हसन मुश्रीफ आणि पी.जी.शिंदे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अनेक वर्षे जिल्हा बँकेच्या माध्यमातून पी.जी.शिंदे आणि हसन मुश्रीफ एकत्र काम करतात, त्यामुळे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे देखील महिला गटातून सौ. शिंदे यांच्यासाठी आग्रही आहेत.

खासदार संजय मंडलिक आणि पी.जी.शिंदे यांची मैत्री सर्वश्रुत आहे, खासदार मंडलिक यांनी देखील सौ. शिंदे यांच्या महिला गटातील उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ,आमदार पी.एन.पाटील, खासदार मंडलिक यांच्यामुळे महिला गटातून सौ. शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे नक्की असल्याचे बोलले जात आहे.

फौंड्री कामगार ते आमदार चंद्रकांत जाधव यांचा थक्क करणारा प्रवास

Follow us – 

ADVERTISEMENT –

Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation