krishnaraj dhananjay mahadik

कृष्णराज महाडिक यांच्याकडून भुदरगड येथील घरांसाठी ८०० पोती सिमेंटची मदत

कोल्हापूर: कृष्णराज धनंजय महाडिक हा यूट्यूब च्या विश्वातील नवीन तारा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असणारं नाव. Krish Mahadik या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्यांचे कुटुंब आणि मित्र यांच्यावर बनवलेले व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहेत.

कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा सुपुत्र असणाऱ्या कृष्णराजला घरातून समाजसेवेचे बाळकडू मिळाले. यूट्यूब कडून मिळालेल्या उत्पनातून रस्त्यावर दिवे विकणाऱ्या आजीकडून खरेदी असो, सामान्य लोकांची दवाखान्याची बिलं भरणे आणि आपल्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर, पुणे आणि मुंबईमधल्या हजारो सामान्य लोकांना धान्याची पॅकेट्स पुरवण्याचे काम कृष्णराजच्या माध्यमातून केलं गेलं. आता २०२१ च्या महापुरात ज्या सामान्य कुटुंबांच्या घराचं अतोनात नुकसान झालं त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम कृष्णराज यांनी सुरू केलं आहे. मागील आठवड्यात त्यांनी भुदरगड तालुक्याचा दौरा केला होता. गावातील लोकांशी संवाद साधत त्यांनी महापुरामध्ये झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. याचाच भाग म्हणून आज कृष्णराज भुदरगड तालुक्यातील ज्या घरांचे महापुरामध्ये नुकसान झाले त्यांना ८०० पोती सिमेंट मदत म्हणून देणार आहेत.

कृष्णराज यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement 

Gadre Tea Company
       Gadre Tea Company