IPL 2022

IPL 2022: कोणता संघ कोणत्या खेळाडूला करणार रिटेन, पाहा संपूर्ण यादी

मुंबई – इंडियन प्रीमियर लीग २०२२(IPL 2022) स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा पार पडण्यापूर्वी मंगळवारी (३० नोव्हेंबर) ८ जुन्या संघांना रिटेन केलेल्या ४-४ खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. ही यादी मंगळवारी रात्री ९ वाजेपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर आयपीएल लिलाव सोहळा केव्हा पार पडणार याची देखील घोषणा करण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊया या स्पर्धेसाठी कुठल्या खेळाडूंना रिटेन केले जाऊ शकते.

क्रिकइंफोने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब किंग्ज संघ कुठल्याच खेळाडूला रिटेन करणार नाहीये. हा संघ ९० कोटी रुपये घेऊन लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार आहे. कुठल्या संघाने कुठल्या खेळाडूला रिटेन केले आहे, हे अजूनही स्पष्ट झाले नाहीये. याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये.

Gadre Tea Company
Gadre Tea Company

यासह स्पर्धेतील इतर ७ संघांनी आपल्या स्टार खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघांनी सर्वाधिक ४-४ खेळाडूंना रिटेन केले आहे, तर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्रत्येकी १-१ खेळाडूंना रिटेन केले आहे. तसेच मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांनी प्रत्येकी २ खेळाडू रिटेन केले आहेत.

काही संघांनी आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी ४-४ खेळाडूंना रिटेन केले आहे. त्यामुळे ठरलेल्या नियमानुसार,आयपीएल २०२२ च्या लिलावात त्यांचे ९० कोटी मधून ४२ कोटी रुपये कमी होतील. ३ खेळाडूंना रिटेन करणाऱ्या संघांचे ३३ कोटी, २ खेळाडूंना रिटेन करणाऱ्या संघाचे २४ कोटी रुपये आणि १ खेळाडू रिटेन करणाऱ्या संघाचे १४ कोटी रुपये कमी होणार आहे.

आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी

कोलकाता नाईट रायडर्स – सुनील नरेन, आंद्रे रसल,वरूण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर

चेन्नई सुपर किंग्ज – रवींद्र जडेजा, एमएस धोनी, मोईन अली, ऋतुराज गायकवाड

सनरायझर्स हैदराबाद – केन विलियम्सन

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल

दिल्ली कॅपिटल्स.- रिषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, एनरिक नॉर्किया

राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन

मोहम्मद शमीला ट्रोल करण्या आधी हे जाणून घ्या.  

Follow us – 

ADVERTISEMENT –

Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation