Chandrakant Jadhav Anna

आमदार चंद्रकांत जाधव यांचे मदत कक्ष पुन्हा सुरू

कोल्हापूर – कोरोनासह आरोग्य विषयक व प्रशासकीय कामकाजात नागरिकांसाठी कॉग्रेसच्या माध्यमातून मदत कक्ष पुन्हा सुरू केले असून, कोणत्याही कामासाठी मोबाईलवरून संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव(Chandrakant Jadhav) यांनी केले आहे.

जुलै ते आक्टोंबर २०२० या काळात आमदार जाधव यांचे मदत कक्ष सुरू होते. या काळात रुग्णांना वैद्यकीय मदत, बेड उपलब्ध करून देणे सह सर्व प्रकारचे सहाय्य नागरिकांना मदत कक्षातून झाले होते. कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्याने हे मदत कक्ष पुन्हा सुरू केल्याचे आमदार जाधव यांनी सांगीतले .

कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. शहरात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशानसनाच्यावतीने उपचार व मदतकार्य सुरू आहे. याच बरोबर कोरोनासह आरोग्य विषयक व प्रशासकीय कामकाजातील कार्यालयीन अडचणी दूर करण्यासाठी आमदार जाधव यांनी मदत कक्ष सुरू केले आहे. नागरिकांच्या अडचणींचे निराकरण तातडीने केले जावे आणि तत्काळ मदत मिळावी यासाठी आमदार जाधव यांनी स्वत:ची स्वतंत्र टीम सक्रिय केली आहे. ही टीम मोबाईलद्वारे नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहील. नागरिकांनी त्यामुळे कोरोनासह अन्य आरोग्य विषयक कोणत्याही प्रकारची मदत व प्रशासकीय कामकाजातील अडथळे दूर करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले आहे.

मदत कक्ष : संपर्क व्यक्ती आणि मोबाईल क्रमांक असे
रोहित पाटील-९५२७३७६४२९
उदय जाधव-९३७११0५४५३.
युवराज उलपे- ९४२२६८३९४९
युवराज पाटील-९८८१७१३९१२

घरीच सुरक्षित रहा..

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही आमदार जाधव यांनी केले आहे.

आमदार चंद्रकांत जाधव यांचा जनतेचे काम करण्याचा कोल्हापूरी पॅटर्न