MP Sanjay Mandlik

खासदार संजय मंडलिक यांना बसला ट्रोलर्सचा फटका

खासदार मंडलिक यांनी बास्केट ब्रीज संदर्भात फेसबूक वर एक पोस्ट केली , या पोस्टवर नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोल करण्यात आले

कोल्हापूर –  पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. कोल्हापूर शहरात येणारी वाहतूक थांबल्यामुळे सर्व व्यवहार थांबले.महामार्ग सुरु होण्यासाठी चार पाच दिवस लागले होते. २०१९ साली देखील महामार्ग पाण्याखाली गेला असल्यामुळे कोल्हापूरचा महामार्गाशी संपर्क तुटला होता. त्यामुळे यावर्षीच्या पुरानंतर बास्केट ब्रिजची चर्चा समाज माध्यमांवर होऊ लागली. बास्केट ब्रिजचा प्रस्ताव  २०१६ साली माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिला होता. पण २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाडिक यांचा पराभव झाला आणि हा विषय मागे पडला.

महापुरानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बास्केट ब्रीज गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कोल्हापूरला भेट दिली. या भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रस्तावानंतर बास्केट ब्रीज साठी निधी मंजूर करण्यात आला होता पण तो निधी परत गेला असे पत्रकार परिषदेत सांगितले. या वक्तव्यानंतर बास्केट ब्रीज चा विषय पुन्हा गाजला. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन बास्केट ब्रीज साठी कोणताही निधी मंजूर झाला नसल्याचे पत्र मिळाल्याचे सांगितले.

काल संजय मंडलिक यांनी वृत्तपत्रात यासंबंधी आलेल्या बातम्यांची कात्रणे आपल्या सोशल मिडिया अकाऊंट वरून पोस्ट केली. या पोस्टवर बऱ्याच कमेंट्स नेटकर्यांकडून टाकल्या गेल्या. बऱ्याच लोकांनी बास्केट ब्रीजचा निधी परत का गेला, तुम्ही बास्केट ब्रीज साठी काय करणार, का तुम्ही नुसते अर्जाच देणार असे प्रश्न विचारले गेले. जवळजवळ सर्वच कमेंट्स विरोधात असल्याने नाईलाजाने खासदार मंडलिक यांना आपली पोस्ट हटवावी लागली. आता हटवलेल्या या पोस्टची चर्चा सुद्धा रंगू लागली आहे. काहींनी पोस्टचे फोटो देखील सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

कोल्हापूरच्या कोरोना परिस्थितीला गोकुळ निवडणूक जबाबदार?