MS Dhoni

राष्ट्र प्रथम! विश्वचषकात धोनी मार्गदर्शकाच्या पदासाठी कोणतेही मानधन बीसीसीआयकडून घेणार नाही

यूएई – १७ ऑक्टोबरपासून टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे सुरुवात होणार आहे. या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने माजी कर्णधार धोनीची भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याच्या नियुक्तीनंतर आता त्याच्या मानधनाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की ‘धोनी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून त्याच्या सेवेसाठी कोणतेही मानधन घेणार नाही.”

आता जवळपास २ वर्षांनंतर पुन्हा एकदा धोनी भारतीय संघासह दिसणार आहे. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याने भारताला ३ आयसीसीच्या ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ सालचा टी२० विश्वचषक, २०११ चा वनडे विश्वचषक आणि २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. धोनीने गेल्यावर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तो २०१९ विश्वचषकात अखेरचा भारतीय संघाकडून खेळला होता.

आयपीएलचा हंगाम १५ ऑक्टोबर रोजी संपल्यानंतर भारतीय खेळाडू टी२० विश्वचषकासाठी एकत्र येतील. भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तान संघाविरुद्ध होईल.

रडणाऱ्या चिमुकीलाला धोनीकडून मिळाले सर्वात भारी गिफ्ट; तुम्ही पाहिलं का?

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company