Now man will be judged in the court of nature!

आता माणसाचा न्याय होईल तो निसर्गाच्या कोर्टातच!

आता न्याय होईल तो निसर्गाच्या कोर्टातच कारण, माणसांनी बनवलेल्या कोर्टात न्याय करण्यात काहीच अर्थ नाही.  माणसाने बनवलेल्या कोर्टातच काय तर खुद्द माणसातही आता माणुसकी राहिली नाही.किती ही लाजिरवाणी बाब आहे. ज्या प्रकारे आज माणूस वागतोय त्या कृत्यांना माणसांच्या कोर्टात जितकी शिक्षा दिली जाईल तितकी कमी आहे. इतकं काय वाईट वागला आहे माणूस??? हा प्रश्न मनात येणं ही चुकीचे आहे.
आज पृथ्वीवर चाललेल्या कोरोना युद्धात अनेक लोकांचे जीव गेले. अम्फान तुफान सारखे मोठे संकट येऊन आदळले तोच टोळधाड सारखे आले आणि आता निसर्ग वादळ आले हे सर्व पाहता माणूस आता म्हणतो देवा काय ते मरण एकदाच दे.. असा कसा देव इतक्या सहज मरण देईल तुम्ही केलेल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब घेऊनच देव मरण देईल.
असं म्हणतात ना, मुले ही देवा घरची फुले असतात. देव मुलांची प्रार्थना लगेच ऐकतो.आणि हे खरं आहे देवाने सगळ्या लहान मुलांची प्रार्थना लगेच ऐकली पण फक्त माणसांच्या मुलांची नाही तर प्राण्यांच्या ही मुलांची प्रार्थना देवाने ऐकली कारण हे प्राणी,पक्षी,मानव हे निसर्ग आणि देवाचीच मुले आहेत. देवाला सगळे सारखे असतात.
सगळ्यांना आठवत असेल की नाही माहीत नाही, पण मध्यंतरी सिरीयातील सरकार आणि विरोधी यांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात अनेक लोकांना जीव गमवावे लागले. त्यातच एक लहान मूल गंभीररुपी जखमी झाले. त्या मुलाने श्वास सोडताना सगळ्यांना रडत रडत मनातले सांगितले आणि त्या निष्पाप मुलाचे शब्द असे होते की, “मी देवाकडे तुमची तक्रार करेन”… त्या लहान मुलाच्या तोंडातून बाहेर पडलेल्या या शब्दाने तिथे असणाऱ्या डॉक्टरना ही विचार करण्यास भाग पाडले. पण माणसाचा स्वार्थीपणा काही कमी झाला नाही तो एकावर एक अमानवी कृत्य करीतच राहिला.


एका कुत्रीसाठी झालेला न्याय हे सुद्धा ऐकल असालच २८ एप्रिल भुवनेश्वर येथील घटना काय घडलं होते त्या रात्री? एक गर्भवती कुत्री त्या रात्री रस्त्याने जात असणाऱ्या दोन महिलांवर भुंकली कुत्र्यांचे कामच ते असते की चोर किंवा कोणीही अज्ञात व्यक्ती दिसल्यास भुंकून सावध करणे.  पण त्या २ महिलांना इतका राग आला की त्या गर्भवती असणाऱ्या कुत्रीला त्यांनी इतके मारले की ती अर्धमेली झाली. तिथे जवळ असणाऱ्या लोकांनी त्याना अडवून त्या कुत्रीला इस्पितळात दाखल केले. सर्जरीद्वारा तिची प्रसूती करण्यात आली. पण डॉक्टर अनेक प्रयत्न करूनही तिला वाचवू शकले नाही आणि २ दिवसांनी तिने जन्म दिलेल्या त्या तिच्या 2 पिल्लांचा ही मृत्यू झाला.


माणुसकीला काळिमा फासणारे अजून एक भयाण कृत्य म्हणजे एका हत्तीणीला अननसातून फटाके खायला दिले गेले . कोणती सजा द्यावी ह्या कृत्याला? काय घडले त्या दिवशी खाण्याच्या शोधार्त भटकत असणाऱ्या एका गर्भवती हत्तींनीला अननसातून फटाके देण्यात आले तिने ही विश्वास ठेवून ते खाल्ले आणि तिच्या तोंडातच त्याचा स्फोट झाला त्यामुळे तिचे सुळे ही तुटले आणि तिच्या तोंडात गंभीर जखमा झाल्या. तिला इतक्या वेदना होत असूनही तिने कोणत्याच प्रकारे नुकसान केले नाही की कोणावर आक्रमण ही केले नाही. अखेर ती वेलीया नदीत जाऊन थांबली तिने सोंड आणि तोंड पाण्यात घातले त्यामुळे तिला थोड्या वेदना कमी वाटू लागल्या तिच्या गर्भात असणाऱ्या तिच्या मुलाला ही त्रास होऊ नये म्हणून ती २ दिवस पाण्यात थांबली आणि तिने त्या नदीतच प्राण सोडला. का संकटे येऊ नये आज आपल्यावर आपण अशी अपेक्षाच कशी करू शकतो? हयाहून भयाण संकटांसाठी तयार रहा कारण,इथे केलेल्या पापांची शिक्षा इथेच भोगावयाची आहे.काय चूक होती, त्या सिरीया मधील मुलाची? काय चूक होती,त्या कुत्रीच्या २ पिल्लांची? आणि काय चूक होती, त्या हत्तींणीच्या पिल्लाची? न्याय हा होणारच आणि तो माणसांच्या नाही आता न्याय होईल तो निसर्गाच्या कोर्टातच!!!