Prithviraj Mahadik

मेघोली बंधारा दुर्घटनेतील शेतकऱ्यांना भाजप कडून १ लाखांची मदत

कोल्हापूर- मेघोली बंधारा दुर्घटनेत ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली त्यांना एक लाखांची मदत देण्याचे भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी जाहीर केले होते. मेघोली येथे शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश आबीटकर यांनी भेट दिली, त्याच दिवशी संध्याकाळी धनंजय महाडिक यांनी भेट देऊन तात्काळ १ लाख रुपयांची मदत जाहीर केली.

काल धनंजय महाडिक युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज धनंजय महाडिक यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह १ लाख रुपयांची मदत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिली. यावेळी बोलताना पृथ्वीराज महाडिक म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात कोणतेही संकट आले तर सर्वात आधी महाडिक कुटुंबीय लोकांच्या मदतीला धावते. लोकप्रतिनिधी येतात आणि आश्वासन देऊन निघून जातात पण महाडिक कुटुंब नेहमीच लोकांना तात्काळ मदत पोहचवते. आणखी काही मदत लागली तर हक्काने सांगा, असेही ते यावेळी म्हणाले.

मेघोली धरण फुटीत जे तरुण संतोष सुतार, उपसरपंच प्रविण पाटील,सचिन पाटील ,प्रकाश पाटील,नामदेव मोहीते हे जनावरांना वाचवायला गेले होते, पण दुर्देवाने अंतिम टप्प्यात वाहून गेले, दैव बलवत्तर म्हणून सर्वजन वाचले पण पाण्याच्या प्रवाहामुळे एक महिला मयत झाली. यामधील संतोष सुतार यांना यामुळे गंभीर दुखापत झाली, त्यांनी खंत व्यक्त केली की एकही प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अजुनही आम्हाला भेटायला आले नाहीत, पण आज धनंजय महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज धनंजय महाडिक यांनी आमची भेट घेतली. त्यांनी आम्हाला वैद्यकीय खर्चासाठी मदत केली.

यावेळी जि.प.सदस्य राहुल देसाई, भाजप जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील,प्रविणसिहं सावंत,देवराज बारदेस्कर,धनाजी देसाई, अल्केश कांदळकर, प्रकाश वास्कर,बाजीराव देसाई,अनिल तळकर,समीर मकानदार,युवाशक्ती भुदरगड तालुका अध्यक्ष नंदकुमार शिंदे, शशिकांत पाटील,प्रवीण आरडे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company