sindhutai sankpal

सिंधुताई सपकाळ पद्मश्री ने सन्मानित: राष्ट्रपतीनी खुर्चीवरून खाली येवून केला सन्मान

नवी दिल्ली: देशाचा सर्वोच्च असणारा पद्म पुरस्कार सोहळा नुकताच राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे संपन्न झाला. या पुरस्काराचे वितरण सन्मानीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कारकर्त्यांना प्रदान करण्यात आले.
यावर्षीच्या पुरस्काराचे मानकरी म्हणून प्रसिद्ध उद्योजक रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे यांच्याबरोबर अन्य तीन मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. गरीब अनाथ मुलांची आई म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना ज्यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात येत होत्या त्यावेळी त्या व्हीलचेअर वरून आल्या होत्या त्यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वतः खाली उतरून येवून त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.
नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात असलेल्या दरबार हॉल मध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. सन २०२१ सालासाठी या पुरस्काराचे त्यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दोन टप्प्यात वितरण करण्यात आले. यावेळी व्यापार व उद्योग क्षेत्रातील योगदान दिलेल्या श्री. महिला गृह उद्योग लिज्जत पापड च्या सहसंस्थापिका जसवंतीबेन जमनादास पोपट यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोन्ही महाराष्ट्रीय महिलांना राष्ट्रपती यांनी आपल्या खुर्ची वरून खाली येवून सन्मानित केले, हि बाब दखल घेण्यासारखी होती.

भाजपची कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीची जबाबदारी महाडिक, कोरे आणि आवाडे यांच्या खांद्यावर

Follow us – 

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company