Press Conference BJP Kolhapur

पालकमंत्र्यांच्या व्यासपीठावर असलेले लोकच त्यांचा कार्यक्रम करतील – धनंजय महाडिक

कोल्हापूर- विधान परिषदेच्या कोल्हापूर निवडणुकीसाठी भाजपकडून माजी आमदार अंमल महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्या अगोदर पंचशील हाॅटेल येथे भाजपा आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली.

पत्रकार परिषदेत बोलताना महाडिक यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर निशाणा साधला, पालकमंत्री सतेज पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत अनेकांच्या कळा काढल्या आहेत. त्यांच्या कारनामामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्याची किंमत पालकमंत्र्यांना या निवडणुकीत मोजावी लागेल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दिला. विधान परिषदेच्या निवडणुकीत अमल महाडिक विजयी होतील. विजयाचा मॅजिक फिगर नक्की गाठू असे ही महाडिक यांनी नमूद केले.  महाडिक म्हणाले, या निवडणुकीत भाजपचे १०५ सदस्य आहेत. आमदार प्रकाश आवाडे आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या पक्षाचे मिळून भाजप आघाडीची बळ १६५ पर्यंत पोहचते. पालकमंत्री ज्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्या पक्षाचे ३५ सदस्य असून, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मिळून ११८ सदस्य होतात. आमच्याकडे १६५ मतांचे पाठबळ असून आम्ही  विजयासाठी आवश्यक मतांची मॅजिक फिगर नक्की गाठू, असे महाडिक यावेळी म्हणाले. पालकमंत्री पाटील यांच्या कारभारामुळे अनेक जण  दुखावले आहेत.गोकुळच्या स्विकॄत संचालकपदी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला अजून न्याय मिळाला नाही. जिल्हामधील काही जणांना मंत्री व्हायचं आहे, काहींना पालकमंत्री व्हायचं आहे.या निवडणुकीत या सगळ्याची किंमत पालकमंत्र्यांना मोजावी लागेल. पालकमंत्र्यांच्या व्यासपीठावर असलेले हे लोकच त्यांचा कार्यक्रम करतील असेही धनंजय महाडिक यावेळी म्हणाले.

या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील संबोधित केले. यावेळी मा. खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, मा. आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितराजे घाटगे, विधानपरिषद उमेदवार अमल महाडिक, आमदार विनय कोरे हे पूर्वनियोजित दौऱ्यामुळे बाहेरगावी असल्याने जनसुराज्यचे प्रतिनिधी म्हणून प्रा. जयंत पाटील आणि पन्हाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रुपालीताई धडेल, मलकापूर नगराध्यक्ष अमोल केसरकर, नगरसेविका अलका स्वामी, जि. प.सदस्य राहूल आवाडे, जि. प.सदस्य अरूण इंगवले, हुपरीचे नगरसेवक अमित गाठ, जि. प.सदस्या शौमिका महाडिक, जि. प. सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर तसेच नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

विधान परिषदेसाठी जनता दलाचा अद्याप कोणालाही पाठींबा नाही

कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक- माजी आमदारांच्या बैठकीत खळबळ

Follow us – 

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company