raju shetty on sugar factory

‘३३०० रुपये ऊसाची पहिली उचल मिळाली नाहीतर हंगाम बंद करू’ : राजू शेट्टींचा इशारा

कोल्हापूर : दरवर्षी प्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद जयसिंगपूर येथे पार पडली. तमाम शेतकरी बांधवांच्या नजरा या ऊस परिषदेकडे लागून होत्या.  यावेळी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांची तोफ बरसली.  दोन्ही सरकार वर त्यांनी कडाडून टीका करत ऊसाला ३३०० रुपये पहिली उचल मिळाली नाहीतर हा हंगाम बंद करण्याचा इशारा सरकारला दिला.

एफआरपी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावरून राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रातील भाजप सरकारला धारेवर धरले. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.

यावर्षी उसाला पहिली उचल ३३०० रुपये प्रति टन दिली गेली पाहिजे, पहिल्या टप्यात विनाकपात एकरकमी एफआरपी देण्यात यावी आणि बाकीची रक्कम जानेवारी पर्यंत दिली गेली नाहीतर मात्र हंगाम बंद पाडू असा इशारा शेट्टी यांनी दिला. जानेवारीत साखर दराची तदस्थिती पाहून आम्ही अंतिम दराबद्दल बोलू  असेही ते म्हणाले. मागील वर्षीच्या उसाला १५० रुपये दिवाळी पूर्वी द्यावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

कोल्हापूरमध्ये पंचगंगा परिक्रमा केली तेव्हा  ५ दिवस उन्हातान्हात आपण सगळे चालत फिरलो,  दोन तरुणांनी नदीत उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. पाय सुजलेल्या अवस्थेत मुख्यमंत्र्यांच्या दारात गेलो. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली, तरी यांना शेतकऱ्यांच्या बद्दल दयामाया नसेल तर आपण काय करायला पाहिजे अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शरद पवार यांच्यावर टीका करत ते म्हणाले की, ‘पवार यांनी कारखानदाराला साथ दिली हे अपेक्षित नव्हते. शेतकऱ्यांनी साथ सोडली तर त्यांना अडचणीचे होईल. सरकार कडे पैसे नसतात तर सरकारी नोकराना महागाई भत्ता कोठून दिला जातो याचे उत्तर मिळाले पाहिजे, दिवाळीला मंत्री येतील त्यांच्या हातात काळे झेंडे घेऊन स्वागत करा. त्यांची दिवाळी गोड होऊ देऊ नका. पूरग्रस्तांसाठी अनेक आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती सांगितली तरी त्यांच्यावर फरक पडला नाही. झालेले नुकसान न भरून निघणारे असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company