Krishnaraj Mahadik and Rohit Pawar

आमदार रोहित पवारांना पडली कृष्णराज महाडिकांची भुरळ

पुणे – कृष्णराज धनंजय महाडिक ( krishnaraj mahadik )  हे नाव सध्या महाराष्ट्रातील युवावर्गाला सुपरिचित आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र यापलीकडे जाऊन कृष्णराजने स्वतःची अशी एक ओळख निर्माण केली आहे. एक युट्युबर म्हणून त्याला संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जातंय पण युट्युबच्या उत्पनातून समाजसेवा करण्याच्या त्याचा ध्यास सामान्यांना भावतो आहे.

महाराष्ट्राचे युवा आमदार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते काल पुण्यातील लक्षवेधी डिजिटल इन्फ्लुअन्सरचा सन्मान लोकमतच्या सहयोगाने करण्यात आला. यावेळी बोलताना रोहित पवारांनी कृष्णराजच्या एकंदरीत प्रवासाचं न त्याने केलेल्या समाजपयोगी कामाचं कौतुक केलं.

रोहित पवारांनी कृष्णराज सारख्या युवकांची महाराष्ट्राला गरज आहे न युवकांनी कृष्णराजचा आदर्श घेऊन समाजासाठी काम करायला हवं असं नमूद केलं.

महाडिक कुटुंबीय आणि भाजप-ताराराणी आघाडीने उभारले १२५ ऑक्सिजन बेडचे मोफत कोविड सेंटर