MP Sanjay Mandlik

………अन कोल्हापूरच्या खासदारांना बसला ट्रोलर्सचा फटका

खासदार मंडलिक यांनी करवीर येथे संकल्प सिद्धी सभागृहात घेतलेल्या सभेमुळे लॉकडाउनमुळे त्रस्त कोल्हापूरकरांनी त्यांना सोशल मिडियावर चांगलाच प्रसाद दिला.

कोल्हापूर –  कोरोनाने सगळीकडे धुमाकूळ घालायला सुरवात केली असताना काही नेत्यांना अजून पण निवडणुकीच्या रॅली घ्यायची इतकी घाई का लागली आहे तेच सामान्य जनतेला कळत नाही. एकीकडे हातावर पोट असणाऱ्या सर्वांना बाहेर पडायला बंदी आणि गोकुळ निवडणूकसाठी प्रचार करायला मात्र नेत्यांना परवानगी असा काहीसा विचित्र प्रकार कोल्हापूरमध्ये घडत आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकांच्या सुरक्षेसाठी बंगालमध्ये प्रचार सभा घेणार नाही असं घोषित केल असताना त्यांच्या विचारांचे सरकार असणाऱ्या महाराष्ट्रमधील कोल्हापूर मध्ये गोकुळ साठी प्रचाराचा नारळ फोडायला नृसिंहवाडी येथे पालकमंत्री सतेज पाटील यांनी १०० च्यावर लोकांना जमा करून त्यांचा घोषणेला हरताळ फासला. सामान्य लोकांना मंदिरात जायला बंदी आणि इथं मात्र राजकीय लोकं आपल्या प्रचारासाठी मंदिर उघडून महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला राजरोसपणे हरताळ फासताना दिसत आहेत अशा भावना त्यांच्या फेसबूक पोस्टच्या खाली लोकांनी व्यक्त केल्या होत्या.
आज करवीर तालुक्यातील गोकुळच्या ठरावधारकांची सभा शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी आयोजित केली होती मात्र संजय मंडलिक यांना आपण कोरोना काळात एवढी मोठी सभा घेऊन आपल्याच मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहोत याचा पूर्ण विसर पडलेला दिसत होता. आपल्या फेसबुकवरून त्यांनी सभेची सविस्तर अशी पोस्ट टाकली होती मात्र त्यांची ती फेसबुक पोस्ट बघून लॉकडाउनमुळे त्रस्त कोल्हापूरकरांनी त्यांना चांगलेच धारेवर धरलं. कोल्हापूरकरांच्या कमेंटचा प्रसाद सहन न झाल्याने खासदार साहेबांनी त्यांची पोस्ट डिलीट केली पण सर्वसामान्य लोकांच्या होणाऱ्या त्रासाची त्यांना फार मोठा फटका सहन करावा लागला.