Satej Patil

कोल्हापूर विधान परिषद निवडणुक बिनविरोध: भाजप-काँग्रेस-शिवसेना यांच्यात समझोता

कोल्हापूर : कोल्हापूर मधील विधान परिषद निवडणुकीचा रंग नुकताच चढत होता, रोज राजकीय बातम्यांनी वातावरण तापत होते. पण आता मात्र यावर पाणी पडले असून कोल्हापूरच्या विधान परिषद निवडणुकीकरिता भाजप-काँग्रेस-शिवसेना यांच्यात राजकीय समझोता झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे बैठकीत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यावर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब करण्यात आले.

दिल्ली मध्ये झालेल्या या बैठकीला व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कोल्हापूर विधान परिषदेतील भाजपचे उमेदवार अमल महाडिक व डमी उमेदवार शौमिका महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबतच्या सूचना भाजपच्या कमांडकडून देण्यात आल्या. परिणामी काँग्रेसचे उमेदवार व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
या दरम्यान, भाजपच्या वरिष्ठ मंडळाकडून महाडिक यांना निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना आल्यानंतर महाडिक कुटुंबीय यांनी बैठक घेतली व पक्षाचा आदेश ग्राह्य मानत माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.
कोल्हापुरात मात्र पाटील व महाडिक या पारंपारीक कट्टर विरोधकांत इर्षेची लढाई सुरू होती. निवडणूक जाहीर झाल्यापासून कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच गरम होऊ लागले होते. जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठी पाटील व महाडीक यांच्यात गेल्या काही वर्षापासून वैरत्व निर्माण झाले आहे. राजकीय वर्चस्वासाठी पाटील व महाडिक यांच्यात प्रचंड टोकाचे राजकारण सुरू होते. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. काटाजोड लढतीमुळे एकेक मतासाठी सर्व मार्गाचा वापर केला जाईल अशी चर्चा होत होती.
परंतू निवडणूक बिनविरोधचा निर्णय झाल्याने कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय भाजपने घेतला आणि सतेज पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे निवडणुकीतील हवा मात्र पूर्णपणे निघून गेली.

Gadre Tea Company
Gadre Tea Company

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पाहता विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू होते. भाजप-काँग्रेस-शिवसेनेत समझोता होण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू होते. काँग्रेसकडून प्रस्ताव गेल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यातही खलबते सुरू होती. भाजपला तीन व काँग्रेस दोन आणि शिवसेना दोन यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा चालू होती. फक्त नागपूरबाबत भाजप आग्रही असल्याने रात्री उशिरापर्यंत चर्चा चालूच होती. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरमधील जागेचाही बिनविरोधमध्ये समावेश होता. चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर शुक्रवारी महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सर्वच निवडणूका बिनविरोध करण्याचे ठरले.
काँग्रेसच्या प्रस्तावाला होकार देत व समझोता करत भाजपने संजय केनेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन डॉ. सातव यांची बिनविरोध निवड केली. त्यानंतर मुंबईतील नगरसेवकांचे बलाबल पाहता शिवसेनेचे सुनिल शिंदे व भाजपचे राजहंस सिंह यांच्या जागाही बिनविरोध करण्यात आल्या. मुंबईमधील एक आणि धुळे व नागपूर अशा तीन जागा भाजपला तर डॉ. सातव यांच्यासह कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्याचे ठरले.

एस टी कामगार संप आज होणार ‘मोठा निर्णय’

Follow us – 

ADVERTISEMENT –

Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation