shivraj naikwade

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव म्हणून शिवराज नाईकवाडे यांची नियुक्ती

कोल्हापूर–  पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती नूतन सचिव म्हणून धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाचे अधीक्षक शिवराज  नाईकवाडे (shivraj naikwade) यांची निवड झाली असून त्यांनी गुरुवारी सूत्रे स्वीकारली. विधी व न्याय विभागाच्या आदेशानुसार समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गेल्या बुधवारी नाईकवाडे यांची सचिवपदी निवड केली होती. काल त्यांना रेखावार यांनी नियुक्तीचे पत्र दिले. त्यानंतर नाईकवाडे यांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन शिवाजी पेठेतील देवस्थान समिती कार्यालयात जाऊन माजी सचिव विजय पोवार यांच्या हस्ते पदभार स्वीकारला. शिवराज नाईकवाडे हे माजी महापौर कै. बंडोपंत नाईकवाडे व माजी उपमहापौर सुलोचना नाईकवाडे यांचे चिरंजीव आहेत.

देवस्थान समितीचे सचिव म्हणून गेली ५ वर्षे सेवा बजावलेले विजय पोवार यांचा गेल्या ३१ ऑगस्ट रोजी कार्यकाल संपला होता.त्यामुळे त्यांची मुंबई मंत्रालयात मृदु व जलसंधारण विभागात अवर सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company