‘Slowly relaxing lockdown’; CM's big announcement about lockdown

‘हळूहळू लॉकडाऊन शिथिल करतोय’ ; लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

देशात आज लॉकडाऊन संपणार होता मात्र केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी हा 30 पर्यंत वाढवला आहे. आता केंद्र सरकार नंतर ठाकरे सरकारनेही लॉकडाऊनचा कालावधी 30 जूनपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय कायम ठेवताना यावेळी राज्य सरकारने काही बाबींमध्ये शिथिलता आणली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित करत याबाबत अधिक माहिती दिली

” लॉकडाऊन हे विज्ञान असेल तर लॉकडाऊन उघडणं ही कला आहे “असं म्हणत  पुनश्च हरिओम असा नारा देत त्यांनी नवीन लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी इतर देशांचा अनुभव पाहून आपण हा निर्णय घेत असल्याचे सांगितले.  हळूहळू लॉकडाऊन शिथिल करतोय. ‘3 जून पासून आता आपण हातपाय हलवायला सुरुवात करू’ असं देखील ते  यावेळी म्हणाले.  जून महिना सुरू झाल्याने आता पावसाळा तोंडावर असल्याने नागरिकांना आपापली काळजी घ्यावी लागेल यावेळी ावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हवामान खात्याची बैठक घेतली यामध्ये समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे , मात्र यावेळी गतवर्षीप्रमाणे पूरस्थिती निर्माण झाली तर त्याला सुद्धा आपण सज्ज आहोत असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.  येत्या काही दिवसातच पश्चिम किनारपट्टीवर जोरदार चक्रीवादळ धडकण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपली यंत्रणा सज्ज आहेत तसेच मच्छीमार बांधवांनी पुढील चार ते पाच दिवस मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये असाआवाहन देखील त्यांनी यावेळी केल आहे. 

लॉकडाऊन उघडताना पाच तारखेपासून काही दुकाने सुरू करणार तर आठ तारखे पासून शासकीय, खाजगी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे . मात्र कार्यालय सुरू करताना कर्मचाऱ्यांची संख्या ही दहा टक्के असणार आहे . महाराष्ट्र किती शिस्तबद्ध आहे याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असे देखील ते यावेळी म्हणाले. 

यावेळी शाळा सुरू करण्याबाबत देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिक माहिती दिली आहे. पदवीच्या परीक्षांबाबत उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे  त्यांनी आज जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यातच त्यांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत देखील घोषणा केली आहे . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यावेळी अंतिम वर्षात सरासरी गुण देऊन पाच करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  तसेच ज्या विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळवायचे इच्छा असेल तर त्यांनी भविष्यात परीक्षा देण्याची संधी ठाकरे सरकार त्यांना नक्कीच उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आजवरच्या विद्यार्थ्यांच्या मागील सेमिस्टर च्या मूल्यांकन आवरून त्यांचा अंतिम वर्षाच्या पदवीचा निकाल लावण्यात येईल तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षा झाल्यावर आपल्याला जास्त मार्क मिळाले असते असे वाटत आहे किंवा शासनाच्या या निर्णयामुळे आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटत असल्यास या विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेतली जाईल. असं देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे