The medical education minister will immediately make 4,000 doctors available for the fight against corona

कोरोनाच्या लढ्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री 4,000 डॉक्टर्स तातडीने उपलब्ध करून देणार

राज्यात सध्या कोरोनाने सर्वांना हैराण केले आहे. सध्या कोरोनाशी लढा देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न राज्य प्रशासनाने मार्फत सुरू आहेत. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी 2019 मध्ये एमबीबीएस परीक्षा पास होऊन बाहेर पडलेल्या आणि तसेच इंटरंशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरते सध्या परिस्थिती पदवी प्रमाणपत्र देण्याचे आदेश यावेळी दिले गेले आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करता येणार असून कोरोनाच्या लढ्यासाठी सुमारे चार हजार डॉक्टर सध्या कोरोनाच्या परिस्थितीत नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. 

 

एमबीबीएस ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर इंटरंशिप पूर्ण करणाऱ्या या विद्यार्थ्यांना तातडीने पदवी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांना दिल्या आहेत. नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 2018 मधील नोव्हेंबर मध्ये घेण्यात आलेल्या वैद्यकीय परीक्षेचा निकाल फेब्रुवारीमध्ये घोषित करण्यात आला होता यामध्ये सुमारे चार हजार विद्यार्थी एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाले होते . या विद्यार्थ्यांची इंटरंशिप मार्च 19 ते फेब्रुवारी 20 दरम्यान पूर्ण झाली आहे. इंटरंशिप पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभाची तारीख अद्याप ठरलेली नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना तात्पुरते तातडीने पदवी प्रमाणपत्र देण्यात येऊन हे विद्यार्थी वैद्यकीय सेवेत दाखल होण्यास पात्र ठरणार आहेत. 

सध्याच्या परिस्थितीत कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची कमतरता भासत आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय सेवेसाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स उपलब्ध  होणार असल्याने आरोग्य सेवेवरील ताण कमी होण्यास मदत होईल असेही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ.संजय मुखर्जी आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांनी या डॉक्टरांच्या सेवा वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये घेणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.