udayanraje

“आमचं म्हणणं पचत नाही त्यामुळे ते पटणार नाही”; उदयनराजेंची फेसबुक पोस्ट

सातारा – भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अंदाज नेहमी हटके असतो त्यामुळे नेहमी तरुणांच्यात आणि राजकारणात चर्चेत असतात. आता त्यांनी फेसबुक लिहलेल्या एका पोस्ट मुळे चर्चेत आले आहेत. सातारा जिल्हा बँकेच्या संदर्भातल्या त्यांच्या पोस्ट मध्ये त्यांनी आपला संताप जाहीररित्या व्यक्त केला आहे.

त्यांच्या पोस्ट मध्ये ते लिहितात कि, “सातारा जिल्ह्यातील निर्णय जिल्ह्यातच झाले पाहिजेत, बैठक कुठंतरी बोलावली आहे. वास्तविक जे मतदार तुम्हाला मत देणार आहेत, आजपर्यंत मत देत आले आहेत, त्यांची मत-मतांतरे आजमावण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेसारखी बैठक बोलवली असती तर ते संयुक्तिक ठरले असते. ज्यांनी सहकारी संस्था मोडकळीस आणल्या, संस्थांचे खाजगीकरण केले, अशा व्यक्तींना जिल्हा बँकेच्या मतदारांनीच बँकेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. माझी इतकी मत आहेत, तितकी मतं आहे असा मी, मीपणा, मीच पाहिजे, हा अहंकार आहे. या अहंकारामुळे मतदारांना गृहीत धरुन हे मताचे राजकारण करीत आहेत. सातारा डिसीसी पहिल्यापासून एक चांगली बँक आहे, लोकहिताचे काम चांगले चाललेले आहे. अशा बँकेला गालबोट लागता कामा नये. कोण संचालक असावे हा विषय आहे. जे नको असतील तर नको, त्याकरीता अट्टाहास नाही. दुसऱ्यांनाही संधी मिळावी म्हणून अट्टाहास नसावा”.
सहकारी संस्था मोडकळीस आणणे, संस्थांचं खाजगीकरण करणे हे कोणी केले, असे थेट प्रश्न त्यांनी कोणाचे नाव न घेता आपल्या फेसबुक पोस्टमधून केले आहेत.
पुढे ते आपले म्हणणे मांडतात कि, “किरकोळ कारणाकरीता डिसीसी मतदारांचा मतदानाचा हक्कच अवैध ठरवण्यात आला. मग वकील देऊन त्या मतदारांची कायदेशीर बाजू मांडली गेल्याने, या मतदारांचा मतदानाचा हक्क अबाधित राहिला. मत कोणाला द्यायचे हा मतदारांचा सार्वभौम अधिकार आहे. मतदान यालाच करा, त्यालाच करा असं बंधन आवश्यक नाही. ज्यावेळी नको ते लोक बँकेत निवडून जातात, त्यावेळेस सहकारी संस्था मोडकळीस आल्या, काही संस्था लिक्वीडेशनमध्ये गेल्या, खाजगीकरण झाले, काही जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकासुध्दा दिवाळखोरीत गेल्याची उदाहरणे आहेत, ज्यांनी सहकारी संस्था स्थापन केल्या, ज्यांनी त्या संस्था मोडकळीस आणल्या, खाजगीकरण केले, त्या लोकांना बँकेच्या व शेतकरी सभासदांच्या लोकहितासाठी बँकेपासून दूर ठेवणे आणि जिल्ह्याचे निर्णय जिल्ह्यातील व्यक्तींनी सार्वमत अजमावून घेणे आजच्या घडीला गरजेचे आहे असे शेतकरी सभासदांच्या वतीने आम्हाला वाटते, परंतु आमचे म्हणणे पचवता येणारे नसल्याने, पटणार नाही”.

‘३३०० रुपये ऊसाची पहिली उचल मिळाली नाहीतर हंगाम बंद करू’ : राजू शेट्टींचा इशारा

सहकाराच्या मुद्द्यावर अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांची बैठक सकारात्मक

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company