Yuvraj Singh

युजवेंद्र चहलचं कारण आणि युवराज सिंगला अटक! पण रोहित शर्माचेही ‘ प्रकरणात नाव’, वाचा अधिक

हरियाणा – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगला हरियाणा पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्याची पोलिसांकडून चौकशी झाली. त्यानंतर त्याला अटकपूर्व जामीनाच्या आधारावर सोडण्यात आले. त्याच्यावर अनुसुचीत जातींविरुद्ध अपमानजनक टिपण्णी करण्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणामध्ये रोहित शर्माचंही नाव आहे. मात्र, त्याला फारसा धोका नाही. तसेच युवराजला अटक होण्यामागे त्याने युजवेंद्र चहलबद्दल बोलताना केलेली अपमानजनक टिपण्णी आहे. हे प्रकरण नक्की काय आहे, हे जाणून घेऊया.

काय आहे प्रकरण?
जवळपास गेले २ वर्षे जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. याच कारनाने गेल्यावर्षी भारतभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे अनेक क्षेत्रांप्रमाणे क्रीडा क्षेत्रदेखील ठप्प झाले होते. त्यामुळे अनेक खेळाडू लॉकडाऊनच्या काळात लाईव्ह व्हिडिओ चॅट करताना दिसून आले होते.

लॉकडाऊनच्या काळात युवराज सिंग, रोहित शर्मा, युजवेंद्र चहल, विराट कोहली, सुनील छेत्री, केविन पीटरसन असे अनेक खेळाडू इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ चॅट करताना दिसले होते. दरम्यान, एप्रिल २०२० मध्ये रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांनीही अशाच व्हिडिओ चॅटच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधला होता. त्यांच्या संभाषणावेळी भारताचे फिरकीपटू कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल देखील ऑनलाईन होते.

त्यामुळे त्यांच्याबद्दल युवराज आणि रोहित यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी युवराज सिंग म्हणाला होता, ‘या भंगी लोकांना काही काम नाही. युझीला (चहल) पाहा. कसला व्हिडिओ टाकला आहे, त्याने त्याच्या कुंटुंबासोबतचा.’ युवराजच्या या वक्तव्यावर रोहित हसताना दिसला होता.

या व्हिडिओनंतर युवराज आणि रोहितवर बरीच टीका झाली होती. तसेच त्या व्हिडिओनंतर ट्विटरवर ‘#युवराज_सिंह_माफी_मांगो’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता.

लॉकडाऊनच्या काळात युजवेंद्र चहल सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय होता. त्याने टिक-टॉकवरील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. अशाच त्याच्या एका व्हिडिओबद्दल युवराजने ही टिपण्णी केली होती. दरम्यान, युवराज आणि युजवेंद्र चांगले मित्र असल्याचे समजते. कारण अनेकदा युवराजला चहलची पायखेची करताना पाहाण्यात आले आहे.

युवराजने मागितली होती माफी
हे प्रकरण चिघळल्यानंतर युवराजने ट्विट करत माफी मागितली होती. मात्र, रोहितने याबद्दल कोणतेही अधिक भाष्य केले नव्हते.

युवराजने माफी मागताना म्हटले होते की ‘मी कोणत्याही प्रकारच्या भेदभावावर विश्वास ठेवत नाही. लोकांच्या कल्याणासाठी मी माझं जीवन जगत आहे. मी माझ्या मित्रांशी बोलत होतो, तेव्हा माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला. एक जबाबदार भारतीय नागरिक या नात्याने जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो आणि त्यांची जाहीररित्या माफी मागतो. देश आणि देशातील लोकांवर माझे कायमच प्रेम राहील.’

युवराजची सध्या सुटका झाली असून तो चंदीगढ़ला रवाना झाल्याचे समजत आहे.

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company