Kisan Credit Card Yojana 2025:
आपल्या देशामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे लोक शेतीचे काम करतात. अशातच शेतकऱ्यांना शेतीचे काम करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. यामुळे शेतकऱ्यांना कोणाकडून तरी पैसे उधार घ्यावे लागतात. परंतु शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारने Kisan Credit Card Yojana 2025 सुरू केली आहे. अशात शेतकऱ्यांना पैशाची गरज पडली तर ते सरकारकडून लोन घेऊ शकतात. पण बऱ्याच शेतकऱ्यांना या लोन योजनेबद्दल माहित नाही त्यामुळे ते या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2025 च्या बजट मध्ये Kisan Credit Card चे लिमिट 3 लाखावरून 5 लाख केले आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी चालना मिळेल असे भारत सरकारचे मत आहे.
जर तुम्ही एक शेतकरी आहात आणि तुम्ही पण या किसान क्रेडिट कार्ड लोन योजनेचा फायदा घेऊ इच्छित असाल तर यातच तुम्हाला आमची पोस्ट खूप मदत करेल. आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या या महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत. त्यामध्ये लोन घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, योजनेचे फायदे आणि व्याज इत्यादी आवश्यक माहिती सांगणार आहोत.
Kisan Credit Card Yojana 2025:
Kisan Credit Card Yojana 2025 ला आपल्या सरकारने गरजू शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. ही एक अशी योजना आहे जिच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरावर लोन भेटते. केंद्र सरकारने रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि नाबार्ड ला घेऊन 1998 मध्ये किसान क्रेडिट लोन योजनेची सुरुवात केली. शेतकऱ्यांना लोन घेण्यासाठी त्यांच्या जवळच्या बँकेत जावे लागते आणि तिथे जमिनीचे कागदपत्रे जमा करावे लागतात आणि त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊन लोन मिळते. शेतीतील कामांसाठी शेतकऱ्यांना लोन कमी व्याज दारावर उपलब्ध करून दिले जाते.
जर तुम्ही 3 लाख रुपये पर्यंतचे लोन घेतात तर तुम्हाला 7 टक्के व्याजदराने पैसे द्यावे लागतील. याप्रमाणे जर तुम्ही अधिक रकमेने कर्ज घेता तर त्यासाठी तुम्हाला जास्त व्याजदर द्यावे लागेल.
हे पण वाचा:Ladki Bahin Yojana February Hafta! या तारखेला मिळणार फेब्रुवारी महिन्यात हप्ता!
Kisan Credit Card Yojana 2025 लाभ:
किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे फायदे मिळतात ते खालील प्रमाणे बघा:
- किसान क्रेडिट कार्डच्या ज्या अटी आहेत ते बँकेच्या तुलनेत खूप सोपे आहेत.
- किसान क्रेडिट कार्ड द्वारे लोन घेऊन शेतकरी त्यांच्या शेती संबंधित कामांमध्ये त्याचा वापर करून योग्य
- वेळेत पिके काढू शकतात त्यामुळे त्यांना चांगला बाजार भाव मिळू शकतो व त्यांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते.
- किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना खूप कमी व्याजदर आहे.
- किसान क्रेडिट कार्ड लोन योजनेमुळे शेतकऱ्यांना असा फायदा होतो की शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घेण्याची गरज नाही.
- किसान क्रेडिट कार्ड लोन मुळे शेतकऱ्यांना खूप जास्त फायदा होतो.
Kisan Credit Card Yojana 2025 व्याजदर:
जर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत लोन घेऊ इच्छित आहेत तर तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की तुम्हाला लोन मागे किती व्याजदर द्यावा लागेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्या तारखेला तुम्ही लोन घेता तेव्हापासून 1 वर्षानंतर तुम्हाला व्याज द्यावे लागते. जर तुम्ही व्यास दिले तरच तुम्ही पुढचे कर्ज घेऊ शकता.
अशातच सरकार तुम्हाला 3 लाख रुपयांपर्यंतच्या लोनवर 3 टक्के व्याज ची सूट देते. त्यामुळेच याला कमी व्याज दरामध्ये मिळणाऱ्या लोन मध्ये ओळखले जाते. किसान क्रेडिट कार्ड वर 9 टक्के दराने व्याज मिळते त्यामध्ये केंद्र सरकारची 2 टक्के सबसिडी आहे.
Kisan Credit Card Yojana 2025:
किसान क्रेडिट कार्ड ची एक गोष्ट खास आहे की यामध्ये तुम्ही तुमच्या मर्जीने पैसे टाकू पण शकता आणि काढू पण शकता. जेव्हा तुम्ही पैसे काढाल तेव्हा तुम्हाला त्याचा व्याज तर द्यावा लागेल. किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांसाठी पाच वर्षांपर्यंत उपलब्ध केले जाते. याप्रमाणे जेव्हा 5 वर्षे पूर्ण होईल तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांच्या किसान क्रेडिट कार्डचे नवीकरण करणे आवश्यक आहे.
Kisan Credit Card Yojana
जेव्हा बँकेद्वारे तुम्हाला लोन दिले जाते जर तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम नसेल तरी पण तुम्ही पैसे काढू शकता. यामध्ये एक निश्चित ओव्हरड्राफ्ट लिमिट निर्धारित केली असते. परंतु लोनची जी सीमा असते ती केवळ बँकेद्वारे निर्धारित केले जाते. याप्रकारे जेव्हापण तुम्ही बँक द्वारे पैसे काढशाल तेव्हा त्या पैशाची व्याज तुम्हाला द्यावे लागेल.
Kisan Credit Card Yojana 2025 लागणारी आवश्यक कागदपत्रे:
किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते खालील प्रमाणे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- आय प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- जमिनीचे कागदपत्र जसे 7/12, 8Aआणि सगळे फेरफार
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- चालू मोबाईल नंबर
Kisan Credit Card Yojana 2025 अर्ज प्रक्रिया कशी करावी?
- सर्वात आधी किसान क्रेडिट कार्ड लोन साठी तुमच्या जवळच्या बँक शाखेमध्ये भेट द्या.
- आता तिथे या योजनेसंबंधीचा अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडून घ्या.
- अर्ज वाचून काळजीपूर्वक भरा व सांगितलेली कागदपत्रे जोडून द्या.
- त्यानंतर अर्ज बँकेकडे जमा करा.
- जर तुमची सर्व कागदपत्रे बरोबर असतील आणि तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला लोन मिळेल.
अधिक माहितीसाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
FAQ:-
काय हे किसान क्रेडीट कार्ड(KCC)?
शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि शेती विषयी असलेल्या गरजांसाठी सोप्प्या पद्धतीने कर्ज मिळावे यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना
सुरु केली आहे. 1998 मध्ये भारत सरकार, भारतीय रिजर्व बैंक (RBI) आणि नाबार्ड(NABARD) यांच्या मदतीने हि योजना चालू केली आहे. KCC च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजात कर्ज मिळते, ज्यातून ते बियाणे, खत, कीटकनाशक आणि शेती पूरक गरजा भागवू शकतात.
कोण घेऊ शकते किसान क्रेडीट कार्ड(KCC)?
या योजनेचा लाभ ते सगळे शेतकरी घेऊ शकतात जे एकटे शेती करतात यामध्ये जमिनीचा मालक आणि भाडे तत्वावर शेती करणारे शेतकरी पण सहभागी आहे. तसेच Self Help Group(SHG) आणि Joint Liablity Group(JLG) मध्ये जोडलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
KCC चे वैशिष्टे कोणती आहेत?
- KCC Card हे एक Magnetic Stripe Card आहे ज्याच्यामध्ये PIN आणि ISO IIN नंबर दिलेला असतो.
- हे सगळ्या बँकांच्या ATM तसेच Micro ATM वर काम करते.
- कार्ड Europay, MasterCard व VISA या Global Payment Network या कंपन्यांमार्फत दिले जाते.
- आधारकार्ड ला जोडलेल्या बैंकिंग सिस्टम च्या माध्यमातून काही बँकामध्ये बायोमेट्रिक Authentication चे डेबिट कार्ड दिले जाते.