PM Internship Scheme: लवकर जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख! आजच अर्ज करा!

PM Internship Scheme:

सरकारने तरुणांसाठी PM Internship Scheme या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना दर महिन्याला पाच हजार रुपये देण्यात येणार आहे. नेमकी ही योजना काय आहे व या योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करावा याबद्दल सविस्तर माहिती या पोस्टमध्ये दिली आहे. तरी पण तुम्ही ही पोस्ट सविस्तर वाचा. PM Internship Scheme ही योजना 3 ऑक्टोबरला सुरू करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. या दरम्यान पीएम इंटरशिप योजना काय आहे, त्यामध्ये कोण अर्ज करू शकतो, या योजनेची सुरुवात कधी झाली हे सर्व या पोस्ट मधून जाणून घेणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PM Internship Scheme या योजनेअंतर्गत पाच वर्षात देशातील सुमारे एक कोटी तरुणांना कंपन्यांमध्ये पीएम इंटरशिप दिली जाणार आहे. या योजनेत इंटरनशिप साठी दर महिन्याला पाच हजार रुपये देण्यात येतील. पाच वर्षाच्या कालावधीत एक कोटी तरुणांना इंटरशिप संधी उपलब्ध करून देण्याची या योजने मागचे उद्दिष्ट आहे. सुरुवातीला इंटरशिपमध्ये भाग घेण्यासाठी सहा हजार रुपये ही रक्कम दिली जाईल. यानंतर एका वर्षासाठी प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल.
इंटरशिप बारा महिन्यांची असून चालू आर्थिक वर्षात 1.25 लाख संधी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्यासाठी आठशे कोटी रुपये खर्च हा केंद्र सरकारला अपेक्षित असून बऱ्याच कंपन्यांनी या योजनेत सुरू करण्यामध्ये रुची दाखवली आहे.

Internship Benefits and Stipend:-

PMIS मध्ये सहभाग घेणाऱ्या उमेद्वांरांना १२ महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी दरमहा 5000 रुपये स्टायपेंड मिळेल. या रकमे मधील 500 रुपये कंपनी मालकाकडून तर उर्वरित 4500 रुपये सरकारकडून थेट इंटर्नच्या आधार-लिंक्ड बँक खात्यात हस्तांतरित केले जातील. याव्यतिरिक्त, प्रत्येक इंटर्नला एकवेळचे 6000 रुपये अनुदान दिले जाईल. स्टायपेंड इंटर्नशिप कालावधीत त्या व्यक्तीचे वर्तन, कामगिरी आणि उपस्थिती यावर अवलंबून असेल.

PM Internship Scheme महत्त्वाची माहिती

तीन ते सहा महिन्यात भारतातील पाचशे कंपन्या इंटरशिप नियुक्त करणार आहेत आणि याकरता ज्या मनुष्यबळाची गरज आहे. त्यामध्ये इंटरशिप मधील तरुणांना सुद्धा सामील करून घेणार आहेत. आपण पुढे बघूया या पीएम इंटरशिप योजनेची नोंदणी केव्हापासून सुरू होत आहे. तर मित्रांनो 10 ऑक्टोबर पर्यंत कंपन्या त्यांच्या घरचा आणि इंटरशिप ची माहिती सरकारला देणार आहेत. इच्छुक तरुणांनी 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करू शकतात.
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबर पर्यंत कंपन्यांना दिली जाईल. हे पोर्टल नुकतेच सुरू करण्यात आले आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत 111 कंपन्या सामील झाले असून यामध्ये महाराष्ट्र, उत्तराखंड, तेलंगणा, गुजरात राज्याचा समावेश आहे.

PM Internship Event
तारीख
घोषणा केल्याची तारीख 03 October 2024
ऑनलाइन अर्जाची तारीख February 2025
अर्जाची शेवटची तारीख 12th March 2025

 

PM Kisan Samman Nidhi Yojana 2025 चा 19 वा हप्ता मिळवण्यासाठी करा या दोन गोष्टींची पूर्तता.!

PM Internship Scheme पात्रता:

PM Internship Scheme चला घेण्यासाठी काही पात्रता निश्चित केली आहे ते खालील प्रमाणे बघा:

  • अर्जदार उमेदवाराची वयोमर्यादा 21 ते 24 वर्ष निश्चित करण्यात आली आहे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • सध्या औपचारिक पदवी अभ्यासक्रम किंवा नोकरी करणाऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • पात्र उमेदवारांनी दहावी, बारावी, डिप्लोमा किंवा पदवीपूर्व पदवी पूर्ण केलेली असावी.
  • ही योजना केवळ बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी आहे – सध्या अर्धवेळ किंवा पूर्णवेळ नोकरी करणाऱ्या व्यक्ती अपात्र आहेत.

PM Internship Scheme निवड प्रक्रिया:

कंपन्या 27 नोव्हेंबर पर्यंत अंतिम निवड ही उमेदवाराची करू शकणार आहे. दरम्यान निवडलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबर पर्यंत कंपन्यांकडून उपलब्ध करून दिली जाईल. कंपन्या उमेदवारांची 27 नोव्हेंबरपर्यंत निवड करतील. इंटरशिप ही बारा महिन्यांकरता सुरू होईल. इंटरशिप साठी निवडलेल्या तरुणांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण सुद्धा दिले जाणार आहे.

सरकार यासाठी प्रीमियम भरणार आहे. कंपन्यांनी निवडलेल्या उमेदवाराला अतिरिक्त अपघात विमा सुद्धा देऊ शकणार आहे. ज्या तरुणांना नोकरी नाही किंवा शिकण्याची इच्छा असून सुद्धा काम मिळत नाही अशा तरुणांना ही योजना म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. ही योजना केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली असून PM Internship Scheme अंतर्गत आता तरुणांना थेट नामांकित देशाभरातील 500 कंपन्यांमध्ये अर्ज करण्याची आणि तेथे का मिळवण्याची संधी सरकार घेऊन आले आहे.

PM Internship Scheme आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. डोमासाईल सर्टिफिकेट
  3. शैक्षणिक प्रमाणपत्र
  4. जन्मदाखला
  5. बँक पासबुक
  6. पॅन कार्ड
  7. मोबाईल नंबर
  8. जात प्रमाणपत्र
  9. ई-मेल आयडी
  10. पासपोर्ट साईज फोटो
  11. सही

PM Internship Scheme अर्ज प्रक्रिया कशी करावी?

पीएम इंटरशिप योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया करण्यासाठी उमेदवाराला काही स्टेप्स ला फॉलो करावे लागेल:

  1. सर्वात आधी उमेदवाराने PM Internship Scheme च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  2. वेबसाईटवर गेल्यानंतर उमेदवाराने रजिस्ट्रेशन करावे.
  3. त्यात आवश्यक माहिती टाकावी जसे नाव, वय, शैक्षणिक पात्रता.
  4. त्यानंतर मागितलेली कागदपत्रे जमा करावी जसे रिझ्युम, शैक्षणिक निकाल व इतर प्रमाणपत्रे.
  5. त्यानंतर उमेदवाराने विभाग निवडावा.
  6. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करून पावती घ्या.

निष्कर्ष:

PM Internship Scheme या योजनेसंबंधी तुम्हाला आम्ही पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती त्याची ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेची निवड प्रक्रिया याबद्दल माहिती दिली आहे.

FAQs

  1. PM Internship Scheme काय आहे?
    या योजनेअंतर्गत पाच वर्षात देशातील सुमारे एक कोटी तरुणांना कंपन्यांमध्ये पीएम इंटरशिप दिली जाणार आहे.
  2. PM Internship Scheme या योजनेमध्ये विद्यार्थ्याला किती अनुदान मिळेल?
    या योजनेत इंटरशिपमध्ये दर महिन्याला पाच हजार रुपये दिले जातील.
  3. PM Internship Scheme ही योजना कोणासाठी आहे?
    सरकारने तरुणांसाठी पीएम इंटरशिप योजनेची सुरुवात केली आहे.
  4. PM Internship Scheme मध्ये Internship किती महिन्याची असते?
    पीएम इंटरनेट योजनेअंतर्गत बारा महिन्यांमध्ये देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळते.
  5. प्रधानमंत्री इंटरशिप योजनेअंतर्गत कोणत्या प्रकारची Internship मिळेल?
    निवड केलेल्या उमेदवारांना सरकारी विभागांमध्ये आयटी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, बँकिंग, फायनान्स, एंटरटेनमेंट, कृषी यासारख्या मोठ्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळेल.
  6. पीएम इंटरशिप नंतर नोकरी मिळते का?
    याची कोणतीही गॅरंटी नसते. हे पूर्ण पद्धतीने कंपनीच्या पॉलिसी निवड प्रक्रिया आणि तुमच्या प्रदर्शनावर निर्भर आहे. हा अनुभव तुमच्या करिअरची संभावना जरूर वाढवते.

Leave a Comment