Ladki Bahin Yojana Rejected List:
महिला व बालविकास विभागाद्वारे मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण केल्यानंतर नऊ लाखापेक्षा अधिक महिलांचे अर्ज रद्द केले आहे आणि त्या महिलांना अपात्र यादी मध्ये टाकले आहे. या यादीत असलेल्या महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही.
नुकतेच झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या वेळी महाराष्ट्र सरकार द्वारे 2 करोड 41 लाख महिलांना फेब्रुवारी महिन्याचा आठवा व मार्च महिन्याचा नववा हप्ता बरोबरच दिला आहे, ज्यामध्ये महिलांना तीन हजार रुपयांची रक्कम दिली आहे. परंतु मार्च महिन्याचा हप्ता वितरण करताना बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांनी नऊ लाख महिलांचे अर्ज रद्द केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 9 लाख अपात्र महिलांची Mazi ladki Bahin Yojana rejected List यादी जाहीर केली आहे. ज्या महिला योजनेच्या पात्रतेमध्ये बसू शकल्या नाहीत त्याच महिलांना या यादीमध्ये शामिल केले आहे.
महिला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून ladki Bahin Yojana चा अर्ज रद्द झाला आहे की नाही बघू शकता.
जर तुम्ही पण तुमच्या अर्जाची स्थिती किंवा योजनेची अपात्र यादी चेक करू इच्छित असाल तर या पोस्टला शेवटपर्यंत वाचा, यामध्ये आम्ही Ladki Bahin Yojana Rejected List कशी चेक करायची याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.
Ladki Bahin Yojana ठळक मुद्दे:
योजनेचे नाव | Majhi Ladki Bahin Yojana |
लाभ | महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार |
योजना कोणी सुरू केली | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
योजनेची सुरुवात | जुलै 2024 |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील महिला |
उद्देश्य | महिलांना आर्थिक रूपाने मदत करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे |
मिळणारी रक्कम | 1500 रुपये |
लाडकी बहीण योजना ॲप | नारीशक्ति दूत एप किंवा अधिकृत वेबसाईट |
हेल्पलाइन नंबर | 181 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | Ladki Bahin Yojana |
Ayushman Card List: मिळणार 5 लाख पर्यंतचा मोफत इलाज! बघा लाभार्थ्यांची यादी!
Ladki Bahin Yojana Rejected List:
Mukhyamantri Majhi ladki Bahin योजनेची सुरुवात 28 जून 2024 मध्ये पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेद्वारे महिला सशक्तीकरणाला बढावा देण्यासाठी सुरु केली. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे होता. योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये ची रक्कम प्रदान केली जाते.
आतापर्यंत या योजनेचे नऊ हप्ते वितरित केले आहेत ज्यामध्ये महिलांना डीबीटी अंतर्गत 13500 रुपयांची वित्तीय मदत केली आहे परंतु नुकतेच मार्च महिन्यातील हप्ता वितरण करताना महिला व बालविकास विभागाद्वारे ९ लाख महिलांना अपात्र घोषित केले आहे.
आता त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
ज्या महिलांना अपात्र केले आहे त्यांची Ladki Bahin Yojana Rejected List जाहीर केली आहे. या यादीनुसार त्या महिला योजनेच्या पात्रतेनुसार अपात्र आहे.
नाकारणाऱ्या यादीत नाव आल्याची कारणे
जर तुमचे नाव ‘लाडकी बहिण योजना नाकारलेली यादी’ मध्ये आले असेल, तर त्यामागे खालील पैकी एक किंवा अधिक कारणे असू शकतात:
१. अपूर्ण किंवा चुकीची माहिती
-
अर्जामध्ये चुकीचा आधार क्रमांक, उत्पन्न प्रमाणपत्रातील विसंगती, चुकीचा मोबाईल नंबर अशा चुका झाल्यास अर्ज नाकारला जातो.
२. योग्यता निकष पूर्ण न होणे
-
जर अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न सरकारी मर्यादेपेक्षा जास्त असेल (उदा. ₹२.५ लाखपेक्षा जास्त), तर अर्ज स्वीकृत केला जात नाही.
-
अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी अथवा ६० वर्षांपेक्षा जास्त असल्यासही अर्ज नाकारला जातो.
३. दुबार अर्ज
-
एकाच व्यक्तीने अनेक वेळा अर्ज केल्यास सिस्टीम त्याला ‘ड्युप्लिकेट’ म्हणून नाकारते.
४. अपात्रतेची स्थिती
-
जर लाभार्थी दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल (जसे की संजय गांधी योजना), तर कधी कधी अर्ज नाकारला जातो.
५. कागदपत्रांची वैधता नसेल
-
अपलोड केलेली कागदपत्रे अस्पष्ट, कालबाह्य किंवा चुकीची असल्यास ती वैध धरली जात नाहीत.
Ladki Bahin Yojana साठी पात्रता:
- महिला अर्जदार ही महाराष्ट्र राज्याची निवासी पाहिजे.
- महिलेचे वय कमीत कमी 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 65 पाहिजे.
- लाभार्थी महिलेचे कुटुंब आयकर दाता नसावे.
- महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे.
- लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टरच्या व्यतिरिक्त इतर चार चाकी वाहन नसावे.
- महिला संजय गांधी निराधार योजनेची लाभार्थी नसावी.
Ladki Bahin Yojana ला लागणारी आवश्यक कागदपत्रे:
माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रेशन कार्ड/ आय प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला/ जन्म प्रमाणपत्र/ डोमासाईल सर्टिफिकेट
- मोबाईल नंबर (आधार कार्ड ला लिंक)
- पासपोर्ट साईज फोटो
- हमीपत्र
- बँक पासबुक (आधार कार्ड ला लिंक)
Ladki Bahin Yojana Rejected List check कशी करावी?
- माझी लाडकी बहीण अपात्र यादी चेक करण्यासाठी सर्वात आधी गुगल क्रोम ओपन करा.
- गुगल ओपन केल्यानंतर ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर जा.
- वेबसाईट ओपन केल्यानंतर अर्जदार लॉगिन वर क्लिक करा.
- आता तुमच्यापुढे एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅपच्या टाका व लॉगिन वर क्लिक करा.
- वेबसाईट लॉगिन केल्यानंतर मेन्यूमध्ये Application made earlier यावर जा.
- आता तुमच्याच पुढे एक नवीन पेज ओपन होईल त्यात application status या पर्यावर क्लिक करून अर्जाची स्थिती चेक करू शकता.
- जर तुमची अर्जाची स्थिती APPROVED आहे तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल परंतु अर्जाची स्थिती REJECTED असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- या पद्धतीने तुम्ही Ladki Bahin Yojana Rejected List चेक करू शकता.
नाकारलेली यादी कशी तपासावी?
१. महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन करा. २. तुमचा User ID आणि पासवर्ड वापरून खाते उघडा. ३. “Application Status” किंवा “Rejected List” पर्यायावर क्लिक करा. ४. तुमचा अर्ज क्रमांक वापरून यादी तपासा. ५. अर्ज नाकारण्याचे कारण स्पष्ट दिलेले असेल.
लाडकी बहीण योजना यादी कशी चेक करावी?
- माझी लाडकी बहीण योजना यादी चेक करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- वेबसाईट ओपन केल्यानंतर Scheme या पर्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजना यादीवर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यात वार्ड निवडा व डाउनलोड वर क्लिक करा.
- Ladki Bahin Yojana Rejected List डाऊनलोड केल्यानंतर महिला यादीमध्ये स्वतःचे नाव चेक करू शकतात.