Maharashtra ZP Bharti 2025:
जिल्हा परिषद ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभाग लवकरच त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जिल्हा परिषद भरती 2025 ची अधिसूचना प्रसिद्ध करणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2025 साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
तुमची तयारी सुरू करण्यासाठी पात्रता निकष, अभ्यासक्रम, परीक्षेच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार तपशील आणि इतर महत्त्वाच्या माहितीबद्दल अपडेट रहा. महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2025 च्या अपडेट साठी या पेजला भेट देत रहा.
Maharashtra ZP Bharti 2025:
महाराष्ट्र ग्रामीण विकास विभाग लवकरच सुमारे 10000 गट ब आणि गट क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी Maharashtra ZP Bharti 2025 जाहीर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार Maharashtra ZP Bharti 2025 ची अधिसूचना येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे.
या ZP भरती मार्फत आरोग्य शिक्षण ग्रामविकास अभियांत्रिकी आणि प्रशासनाशी संबंधित वेगवेगळे पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये आरोग्य सेवक/ सेविका, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लिपिक, लेखनिक, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश असेल. अधिकृत जाहिरात लवकर प्रसिद्ध होणार असून अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि परीक्षा पद्धती याबद्दलची संपूर्ण माहिती जाहीर केली जाईल. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी सतत अपडेट राहणे गरजेचे आहे. Maharashtra ZP Bharti 2025 बद्दल सतत अपडेट मिळवण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट देत रहा.
संस्थेचे नाव | जिल्हा परिषद ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभाग |
भरतीचे नाव | जिल्हा परिषद भरती 2025 |
पदांचे नाव | आरोग्य सुपरवायझर,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, फार्मसी, कंत्राटी ग्रामसेवक, जुनियर इंजिनियर, सिविल, ज्युनियर मेकॅनिकल इंजिनियर, ज्युनियर सुपरवायझर, मेकॅनिक, सीनियर असिस्टंट, क्लर्क, सिविल इंजीनियरिंग, असिस्टंट |
एकूण पदे | लवकरच जाहीर केले जाईल |
भरतीची तारीख | लवकर जाहीर केली जाईल |
शेवटची तारीख | लवकर जाहीर केली जाईल |
पगार | 19900 ते 124000 |
अर्जाचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा सीबीटी |
नोकरीची जागा | महाराष्ट्र |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :PM Internship Scheme: लवकर जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख! आजच अर्ज करा!
Maharashtra ZP Bharti 2025 शैक्षणिक पात्रता:
ZP भरतीसाठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे:
- आरोग्य पर्यवेक्षक: विज्ञान शाखेतील पदवी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्यांचा कोर्स
- आरोग्य सेवक पुरुष: दहावी उत्तीर्ण
- आरोग्य सेवक महिला: सहाय्यकारी प्रसारिका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेत नोंद
- औषध निर्माण अधिकारी: बी फार्मसी, डी फार्मसी
- कंत्राटी ग्रामसेवक: बारावी मध्ये 60 गुण उत्तीर्ण आणि अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा बी डब्ल्यू एस किंवा कृषी डिप्लोमा
- कनिष्ठ अभियंता: अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा
- कनिष्ठ अभियंता यांत्रिकी: यांत्रिकी पदवी डिप्लोमा
- कनिष्ठ लेखाधिकारी: पदवीधर आणि पाच वर्षाचा अनुभव
- कनिष्ठ सहाय्यक लिपिक: दहावी उत्तीर्ण, मराठी इंग्रजी टायपिंग फास्ट पाहिजे
- पर्यवेक्षिका : समाजशास्त्र, गृह विज्ञान, शिक्षण, बालविकास व पोषण पदवी
- पशुधन पर्यवेक्षक: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ: भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र पाणीशास्त्र मायक्रोबायोलॉजी पदवी
- वरिष्ठ सहाय्यक: लिपिक पदवीधर पाहिजे
Maharashtra ZP Bharti 2025 वयोमर्यादा:
- सर्वसाधारण प्रवर्ग : 18 ते 40 वर्षे
- मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
- दिव्यांग उमेदवार: 18 ते 45 वर्ष
- प्रकल्पग्रस्त: 18 ते 45 वर्ष
- भूकंपग्रस्त: 18 ते 45 वर्ष
- अंशकालीन: 18 ते 55 वर्ष
- माजी सैनिक: 18 ते 55 वर्ष
- खेळाडू: 18 ते 43 वर्ष
- अनाथ: 18 ते 43 वर्ष
Maharashtra ZP Bharti 2025 अर्ज फी:
खुला प्रवर्ग: 1000
मागासवर्गीय :900
Maharashtra ZP Bharti 2025: आवश्यक सूचना
- अर्थात खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती लपून ठेवणे किंवा त्यात बदल करणे किंवा पाठवलेल्या दाखल्यांच्या प्रतीतील नोंदीत अनावश्यक पणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले व बनावट दाखले सादर करणे, परीक्षा केंद्रातील गैरवर्तन परीक्षेचे वेळी नक्कल करणे, वशीला लावण्याचा प्रयत्न करणे यासारखे अथवा परीक्षा कक्षाच्या बाहेर किंवा परीक्षानंतरही गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना गुण कमी करणे, विशिष्ट किंवा सर्व परीक्षांना निवडींना अपात्र ठरवणे यापैकी काही घडले तर त्यासंबंधी कारवाई करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद यांना राहतील.
- तसेच अटी पूर्ण करणारा किंवा गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवड होण्यास अपात्र ठरेल तसेच निवड झाल्यानंतर देखील सेवा समाप्तीस पात्र ठरेल.
- वयाच्या पुराव्यासाठी क्षम प्राधिकार्याने दिला जन्मदाखला शाळा सोडल्याचा दाखला दहावीचे प्रमाणपत्र व अधिवासाबाबत शासनाकडील अधिकारणे दिलेले प्रमाणपत्र काही ग्राह्य धरण्यात येतील.
- संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा शैक्षणिक अहर्ता धारण केल्याचा दिनांक समजण्यात येईल व त्या आधारी उमेदवाराची पात्रता ठरवण्यात येईल.
- गुणांऐवजी श्रेणी पद्धत असल्यास कागदपत्र पडताळणीची वेळी उमेदवारांनी गुणपत्रकासोबत श्रेणीची यादी सादर करावी.
- नवीन वापरकर्त्याची नोंदणी वर क्लिक केल्यानंतर लॉगिन पृष्ठ प्रदर्शित दिसेल. नवीन खाते वापरकर्त्याचे नाव नवीन पासवर्ड निर्माण करण्यासाठी लॉगिनद्वारे विचारलेली सर्व माहिती भरून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी.
Maharashtra ZP Bharti 2025: लागणारी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र
- शैक्षणिक पुरावे
- वयाचा पुरावा
- जन्माचा पुरावा
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
- खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र
- विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
- पदवीधर किंवा पदवीधारक असल्याचे प्रमाणपत्र
- MSCIT अथवा सम कक्ष प्रमाणपत्र
- टंकलेखन प्रमाणपत्र लघुलेखन प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र
Maharashtra ZP Bharti 2025: अर्ज प्रक्रिया कशी करावी?
- सर्वात आधी आयबीपीएस वेबसाईटवर जाऊन तुमचे अकाउंट तयार करा.
- अकाउंटला लॉगिन करून Apply Online या पर्यायावर वर क्लिक करा.
- तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करून अर्जाचा फॉर्म व्यवस्थित भरा.
- लागणारी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- अर्जाची फी भरा.
- अर्ज एकदा व्यवस्थित तपासून पहा व सबमिट बटन वर क्लिक करा.