Salokha Yojana Maharashtra 2025: सलोखा योजना शेत जमिनी संबंधी वाद मिटवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना

Salokha Yojana Maharashtra 2025:

महाराष्ट्र सरकारने शेत जमिनी संबंधी असलेले वाद मिटवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे तिचे नाव सलोखा योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांमध्ये असलेल्या जमिनीवरील वादांची निराकरण करणे आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे. आजच्या पोस्टमध्ये आपण सलोखा योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या अटी, पात्रता, फायदे आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे दिली जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Salokha Yojana Maharashtra 2025 सलोखा योजना काय आहे?

सलोखा योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांसाठीची योजना आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेत जमिनी संबंधी असलेले वाद कमी करणे. शेत जमिनीसाठी असलेले वाद अनेक कारणांमुळे उत्पन्न होतात, जसे की ताबा व वहिवाटीची वाद, शेत बंधारावाद, जमीन रस्ता वाद इत्यादी. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शासकीय स्तरावर शेत जमिनीच्या ताब्यात बदल घडवून आणण्यास मदत केली जाईल. आपल्या महाराष्ट्र राज्याचे शेत जमिनी संबंधी वाद असलेल्या शेतकऱ्यांची संख्या एकूण 13 लाखाहून अधिक आहे. यावर पर्याय म्हणून सलोखा योजना राबविण्यात आली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी शुल्कात ताब्यात बदल करण्याची संधी मिळेल.

Salokha Yojana Maharashtra 2025 सलोखा योजनेची उद्दिष्टे:

  • शेतकऱ्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडून आणणे.
  • न्यायालयात चालू असलेल्या वादांची लवकर निराकारण करणे.
  • शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीकडे लक्ष देण्यास मदत करणे.
  • शेतकऱ्यांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण करणे.
  • शेततळे वरील ताब्याची वाद मिटवणे.

हे पण वाचा :Post Office Best Scheme: फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू जाणून घ्या पूर्ण माहिती!

Salokha Yojana Maharashtra 2025 सलोखा योजनेच्या अटी आणि शर्ती

  • अर्ज करणारा अर्जदार हा शेतकरी असावा आणि त्याच्याकडे बारा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपासून शेत जमिनीचा ताबा असावा.
  • अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. बाहेर राज्याचे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
  • अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तसेच अर्जदाराचे शेत सातबारा उतारा वर दाखल असावे.
  • शेतकऱ्याच्या नावावर असलेले शेत जमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या ताब्यात गेली असल्यास या दोघांसाठी सलोखा योजना लाभदायी ठरेल.
  • अर्जदाराकडे मोठ्या आकाराची चार चाकी गाडी नसावी त्यामुळे सलोखा योजनेसाठी जास्तीत जास्त संपत्ती असलेल्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे.
  • सलोखा योजनेंतर्गत दोन्ही पक्षकाराची जमीन हि यापूर्वी-तुकडा घोषित केली असेल तर त्याबाबत प्रमाणित करण्यात गटबुकची प्रत दस्तास जोडून अदलाबदल दस्त नोंदवून त्याचप्रमाणे दस्ताचे वस्तुस्थितुनुसार फेरफार नोंदवता येईल.
  • पहिल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे या व्यतिरिक्त इतर वैयक्तिक जमिनीचे अदलाबदल करण्याबाबत प्रकरणाचा सलोखा योजनेत समावेश असणार नाही किंवा अशी प्रकरणे मुद्रांक शुल्क व नोदणी फी सवलतीस पात्र राहणार नाहीत.

Salokha Yojana Maharashtra 2025 सलोखा योजना कशी काम करते?

सलोखा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वादग्रस्त जमिनीच्या ताब्यात बदल करण्याची सुविधा म्हणून मिळते. म्हणजेच एका शेतकऱ्याच्या नावावर असलेली जमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या ताब्यात केली आहे, तर दोन्ही शेतकऱ्यांना एकमेकांच्या जमिनीचा ताबा घेण्यास सवलत दिली जाईल. यासाठी मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क कमी केले जाईल.

Salokha Yojana Maharashtra 2025 सलोखा योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया:

  • सलोखा योजनेसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल‌.
  • अर्ज संबंधित गावातील तलाठी यांच्याकडे करावा लागेल.
  • अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केला पाहिजे.
  • अर्ज सादर केल्यानंतर संबंधित अधिकारी पंचनामा करून ताब्याचा बदल प्रक्रिया सुरू करतील.

Salokha Yojana Maharashtra 2025 सलोखा योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना होईल?

महाराष्ट्र राज्यामध्ये 44 हजार 278 गावांमध्ये तीन कोटी 37 लाख 88 हजार 253 शेतकरी आहेत. त्यापैकी तेरा लाख 28 हजार 340 शेतकऱ्यांना सलोखा योजनेचा थेट लाभ होईल. या शेतकऱ्यांचे शेत जमिनीच्या ताब्याबाबत वाद आहेत आणि या योजनेद्वारे त्यांच्या शेतजमिनींच्या ताब्यात बदल करणे सोपे होईल.

Salokha Yojana Maharashtra 2025 सलोखा योजनेचे फायदे:

  • शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरील वाद विविध कारणामुळे निर्माण होऊ शकतात. सलोखाय योजनेमुळे हे वाद लवकर निराकार होऊ शकतात. यामुळे शेतकऱ्यांना शेती कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळेल. या योजनेमुळे विविध वादांची निराकरण होईल.
  • सलोखा योजनेद्वारे शेतकऱ्यांना ताब्यात बदल करण्यासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कात सवलत दिली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा आर्थिक ताण कमी होईल.
  • सलोखा योजनेमुळे शेतकऱ्यांना ताब्याच्या वादापासून मुक्तता मिळेल आणि ते शेतीकडे अधिक लक्ष देऊ शकतील यामुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होईल आणि शेत जमिनी संबंधी असलेले मान दूर होऊन समाजात सलोखा निर्माण होईल.
  • सलोखा योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे.
  • आप-आपसातील वैर व वादविवाद संपून चांगले नाते बनेल.
  • सलोखा योजनामुळे होणारा वाद हा न्यायालयपरेंत पोहचत होता.वाद-विवाद झाल्यानतर न्यायालयच्या चकरा मारण्यासाठी व वकील लावण्यासाठी लागणारा खर्च व वाया जाणार हि वेळ हि आता वाचेल.
  • शेतकऱ्यांचे अनेक आप –आपसातील वादामुळे जमिनी ह्या खूप अधिक प्रमाणत पडीत राहत होत्या.शेतकऱ्याकडे जमीन असूनही त्याची करण्याची मानसिकता नाही राहत.अश्या वेळी उत्पनाचा साधन नसल्यामुळे शेतकऱ्यांना सावकारच कर्ज घेवून घर खर्च चालावे लागते.कर्जाची परत फेड होत नाही त्यामुळे शेतकरी हा तणावात जाऊन आत्महत्या करतो अश्या गोष्टी हि सलोखा योजनेमुळे थांबतील.

Salokha Yojana Maharashtra 2025 योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

  • अर्ज पत्र
  • आधार कार्ड
  • सातबारा उतारा
  • चार सीमांची दस्तावेज
  • संबंधित जमिनीचा तपशील

FAQs:

  1. सलोखा योजनेमध्ये बारा वर्षापेक्षा कमी कालावधीत ताबा असल्यास मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफ होईल का?
    नाही, बारा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा ताबा असलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल.
  2. या योजनेचा लाभ नॉन अग्रिकल्चर जमिनीसाठी घेतला जाऊ शकतो का?
    नाही, ही योजना फक्त शेत जमिनीसाठी आहे.
  3. तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित नसल्यास काय करावे?
    तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागता येईल.

Salokha Yojana Maharashtra 2025 निष्कर्ष

सलोखा योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपाय आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीच्या ताब्यातील वाद लवकर मिटवता येईल. यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल.

Leave a Comment