Maharashtra Police Bharti 2025:
महाराष्ट्र पोलीस (महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग) पोलीस कॉन्स्टेबल (पोलीस शिपाई), पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (पोलीस शिपाई चालक), एसआरपीएफ सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल या पदांसाठी नवीन भरती जाहीर करणार आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज या वेबसाईटवर ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग भरती मंडळ महाराष्ट्र यांनी 2025 च्या जाहिरातीत एकूण 33000 रिक्त पदे 16.6% महिला पोलीस पदांसह जाहीर केली आहेत. Maharashtra Police Bharti 2025 ऑनलाइन अर्ज २०२५ पासून सुरू झाले होते.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल. इच्छुक उमेदवारांना पोलीस कॉन्स्टेबल भरती 2025 एसआरपीएफ महाराष्ट्र भरती 2025, महाराष्ट्र पोलीस भरती बद्दल नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमची वेबसाईटला आवश्यक फॉलो करा. उमेदवारांची पात्रता, परीक्षेचा अभ्यासक्रम, मागील वर्षाची प्रश्नपत्रिका, नमुना पत्रिका, उत्तर पत्रिका, महाराष्ट्र पोलीस भरती प्रवेश पत्र, लेखी आणि शारीरिक चाचणीचे गुण वितरण तात्पुरते निवड कागदपत्र पडताळणी तात्पुरती गुणवत्ता यादी अंतिम गुणवत्ता यादी शारीरिक आणि ड्रायव्हिंग चाचणी निकाल आणि महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग भरती संबंधित इतर सर्व आवश्यक माहिती येथे अपडेट केली आहे.
Maharashtra Police Bharti 2025 महत्त्वाची माहिती:
पोस्ट चे नाव | Maharashtra Police Bharti 2025 |
विभागाचे नाव | महाराष्ट्र स्टेट पोलीस डिपार्टमेंट |
पदाचे नाव | पोलीस कॉन्स्टेबल
पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर SRPF पोलीस कॉन्स्टेबल |
एकूण पदे | 33000 |
पगार | 5200 – 20200 |
जॉब लोकेशन | महाराष्ट्र |
अर्ज भरण्याची तारीख | लवकर जाहीर होईल |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :Anganwadi recruitment 2025 : सुपरवायझर व इतर पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!!
Maharashtra Police Bharti 2025 पात्रता:
- शैक्षणिक पात्रता अर्जदार हा बारावी पास पाहिजे.
- वयोमर्यादा १८ ते २८ वर्ष
- पोलीस शिपाई भरती प्रक्रिया मध्ये होणाऱ्या शारीरिक चाचणीमध्ये महिला आणि पुरुष यांच्यासाठीचे काही नियम ठरवले आहेत. तर तुम्ही पोलीस शिपाई भरती करता तयारी करत असाल तर खाली दिलेल्या शारीरिक चाचणीचे नियम नक्कीच लक्षात ठेवा.
पुरुष शारीरिक चाचणी नियम
पोलीस भरती प्रक्रिया मध्ये जर पुरुष उमेदवार अर्ज करत असतील तर शारीरिक चाचणी करता आवश्यक असणाऱ्या खालील अटींची पूर्तता ती उमेदवार करत असेल तरच त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
पुरुष उमेदवार यांची उंची 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी.
छाती न फुगवता 79cm पेक्षा कमी नसावी आणि छाती फुगून आणि न फुगवता यातील फरक 5 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा.
- 20 मार्क्स :1600 मीटर धावण्यासाठी
- 15 मार्क्स :100 मीटर धावण्यासाठी
- 15 मार्क्स: गोळा फेक साठी
- एकूण मार्क: 50
महिला शारीरिक चाचणी नियम
महिला उमेदवारांना पोलीस शिपाई भरती मध्ये खाली दिलेल्या नियमांचे पालन करावे लागेल तरच त्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल.
महिला उमेदवाराची उंची 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी.
- 20 मार्क्स:800 मीटर धावण्यासाठी
- 15 मार्क 100 मीटर धावण्यासाठी
- 15 मार्क्स गोळा फेक साठी
- एकूण मार्क्स 50
सूट:
वरती दिलेल्या सर्व शारीरिक चाचणी नियमांमध्ये काही केसेस मध्ये सूट दिली जाते
महाराष्ट्र सरकारने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागात राहणारे अनुसूचित जमातीचे उमेदवार असतील किंवा एखाद्या वेळेस नक्षलवादी विरोधी कारवाई मध्ये जखमी झालेले, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले किंवा मरण पावलेले पोलीस बातमीदार पोलीस पाटील किंवा पोलीस कर्मचारी यांची अपत्य जर या पोलीस शिपाई भरती करता अर्ज करत असतील तर त्यांच्या शारीरिक चाचणीमध्ये खालील सवलती किंवा शिथिलता दिल्या जातील.
- महिला व पुरुष उमेदवार करता 40 सेंटीमीटर उंची
- छातीचे मोजमाप करता कोणतीही अट नसेल
- तर अर्जदार खेळाडू असतील तर अशा महिला व पुरुष उमेदवारांना शारीरिक चाचणीच्या किमान उंचीच्या अटमधून 2.5 सेंटीमीटर इतकी सूट देण्यात येते.
Maharashtra Police Bharti 2025 निवड प्रक्रिया:
- शारीरिक चाचणी
- लेखी परीक्षा
- कागदपत्रे पडताळणी
Maharashtra Police Bharti 2025 Application Fee:
- साधारण श्रेणी: 450
- राखीव श्रेणी: 350
Maharashtra Police Bharti 2025 अभ्यासक्रम:
- सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी: 25 गुण
- बुद्धिमत्ता चाचणी: 25 गुण
- अंकगणित: २५ गुण
- मराठी व्याकरण 25 गुण
लेखी परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न बहुपर्यायी प्रश्नांचे प्रकार असतील आणि ते मराठी भाषेत घेतले जातील. परीक्षेत किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे.
Maharashtra Police Bharti 2025 आवश्यक कागदपत्रे:
सर तुम्ही Maharashtra Police Bharti 2025 करता ऑनलाइन अर्ज करणार असाल तर तुम्ही खाली दिलेली आवश्यक सर्व कागदपत्रे तुमच्याकडे आहेत की नाही याची खात्री करूनच अर्ज करावा, जेणेकरून शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ऐनवेळी कागदपत्र पडताळणी मधून बाद होणार नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करण्याआधी खाली दिलेले कागदपत्रे यांची यादी पडताळून बघून अर्ज करावा.
- दहावीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
- बारावीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला बोनाफाईड किंवा जन्म दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
- पदवी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
- आरक्षण प्रमाणपत्र
- ऑनलाइन अर्ज केले याची प्रत त्याबद्दलची सर्व कागदपत्रे
- मैदानी आणि लेखी परीक्षा प्रवेश पत्र
- चार पासपोर्ट साईज चे फोटो
- आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड
- प्रसिद्ध झालेली निवड यादी सोबत असणे आवश्यक
- पदव्युत्तर पदवी असल्यास प्रमाणपत्र व गुणपत्रक
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्यास प्रमाणपत्र
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
- भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
- होमगार्ड प्रमाणपत्र
- पोलीस पाल्य असल्यास ते प्रमाणपत्र
- अनाथ प्रमाणपत्र
- खेळाडू असल्यास वेरिफाय केलेले खेळाडू प्रमाणपत्र
- माजी सैनिक असल्यास संबंधित कागदपत्रे
- MSCIT केली असल्यास प्रमाणपत्र
अशाप्रकारे सर्व वरील कागदपत्रे असेल तरच उमेदवारांनी त्यांची नोंद ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना करावी.
Maharashtra Police Bharti 2025 अर्ज प्रक्रिया:
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टलवर नोंदणी करावी लागेल त्यानंतर लॉगिन करून अर्ज करा आणि शुल्क भरा
1. नोंदणी
- महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टल या संकेतस्थळावर जा.
- न्यू कँडिडेट रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरून नोंदणी करा.
2. लॉगिन
- नोंदणी केल्यानंतर दिलेल्या युजरनेम आणि पासवर्ड चा वापर करून लॉगिन करा.
3. अर्ज
- अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
- अर्ज फॉर्ममध्ये विचारली सर्व माहिती सविस्तरपणे भरा.
- आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज पूर्ण झाल्यावर सबमिट करा.
4. फी पेमेंट
- अर्जासोबत अर्जाची फी भरा.
- फी भरल्याची प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन उपलब्ध असू शकते.
महत्त्वपूर्ण माहिती:
- अर्ज भरण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या सूचनेतील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
- अर्जात कोणतीही माहिती चुकीची असल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
- अर्जाची फी भरण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवा.