PM Kisan Samman Nidhi Yojana:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवली जाणारी पीएम किसान योजना या अंतर्गत शेतकऱ्यांना तर चार महिन्यानंतर हप्ता दिला जातो. 2018 पासून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 19 हप्ते दिले गेले आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये दोन हजार रुपयांच्या तीन हत्याप्रमाणे सहा हजार रुपये केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून दिले जातात. केंद्र सरकारने PM Kisan Samman Nidhi Yojana द्वारे आत्तापर्यंत जवळपास शेतकऱ्यांना 19 हप्त्यांची रक्कम दिली आहे. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना PM Kisan Samman Nidhi Yojana च्या सर्व हप्त्यांची रक्कम मिळाली असेल ती एकूण 38 हजार रुपये इतकी होते. या योजनेच्या 19 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना 24 फेब्रुवारी 2025 या दिवशी देण्यात आली होती. आता शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. पी एम किसान च्या दोन हत्यांमध्ये साधारणपणे चार महिन्यांचा कालावधी असतो पण पीएम किसान च्या शेतकऱ्यांना तीन गोष्टी अपूर्ण असल्यास पूर्तता करण्यास 31 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
ई-केवायसी, बँक खाते, आधार लिंक आणि जमीन पडताळणी आवश्यक :
पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना विसावा हप्ता जून महिन्यात मिळेल, अशी शक्यता आहे. आता पी एम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी बिना अडथळा लाभ मिळवण्यासाठी ही केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे बँक खाते आणि आधार क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. लाभार्थी शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर शेतकऱ्याने त्याची पडताळणी पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे. या गोष्टींची पूर्तता करण्यास पीएम किसान सन्मान निधी तर्फे विशेष मोहीम राबवली जात आहे. एक मे ते 31 मे दरम्यान या गोष्टी पूर्ण असतील तरच या योजनेचा लाभ मिळेल. पी एम किसान सन्मान निधी योजना निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सेच्युरेशन ड्राईव्ह सुरू करण्यात आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी या गोष्टीची पूर्तता केल्या शेतकऱ्यांना पीएम किसान ची रक्कम मिळण्यात अडचण येणार नाही.
PM Kisan 20th Installment Date:
पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्याचा लाभ देण्यासाठी अनेक प्रकारचे काम केले जात आहे. सरकारद्वारे शेतकऱ्यांची पात्रता स्पष्ट करण्यासाठी आधी किसान योजनेची बेनिफिशरी लिस्ट अपलोड केली जात आहे.
पी एम किसान योजनेच्या बेनिफिशियरी लिस्ट मध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सहभागी केले जात आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची नावे महत्त्वपूर्ण लिस्टमध्ये शामील आहेत त्यांनाच पुढचा हप्ता दिला जाईल.
जे शेतकरी आज आमच्या पोस्टवर व्हिजिट करत आहेत त्या सर्वांसाठी आम्ही इथे पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल ची माहिती व त्या संबंधी वेगवेगळी माहिती आणि हप्ता येण्याची संभावित तारीख याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
हे पण वाचा :namo shetkari yojana आत्ता शेतकऱ्यांना मिळणार आत्ता वर्षाला 12000 रुपयांचा लाभ !
PM Kisan Samman Nidhi Yojana पात्रता:
- पीएम किसान योजनेअंतर्गत विसाव्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना खाली दिलेल्या पात्रता पूर्ण कराव्या लागतील:
- शेतकऱ्याच्या नावावर पाच एकर पेक्षा जास्त जमीन नसावी.
- शेतकऱ्याकडे पिवळे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे.
- शेतकऱ्याच्या कुटुंबामधील कोणताही व्यक्ती हा सरकारी नोकरी किंवा इतर परमनंट रोजगारांमध्ये नसावा.
- शेतकऱ्याचे नाव सर्वेक्षणानुसार पी एम किसान योजनेच्या बेनिफिशरी लिस्टमध्ये असणे गरजेचे आहे.
- योजनेच्या नियमानुसार शेतकऱ्याने 19 व्या हप्त्याचा लाभ घेतलेला असावा.
PM Kisan Samman Nidhi Yojana 20th hapta date:
अनेक ऑनलाईन रिपोर्टच्या आधारे पीएम किसान सम्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा जून 2025 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाऊ शकतो. सरकारकडून अजून याची पुष्टी झाली नाही.
पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची एकेवायसी करावी लागते आणि स्वतःचा आधार नंबर बँक खात्याला लिंक करणे आवश्यक आहे. या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
PM Kisan Samman Nidhi Yojana रजिस्ट्रेशन प्रक्रिया:
- सर्वात आधी पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- होम पेजवर farmers corner या सेक्शन मध्ये जाऊन new farmer registration या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्हाला दोन पर्याय मिळतील.
- Rural form registration : हा पर्याय त्या नागरिकांसाठी आहे जे ग्रामीण क्षेत्रातील शेतकरी आहेत.
- Urban farmer registration: हा पर्याय त्या नागरिकांसाठी आहे जे शहरातील क्षेत्रातील शेतकरी आहे.
- कोणत्याही एका पर्यायावर क्लिक करा.
- पुढच्या पेजवर तुमचा आधार नंबर टाका आणि कॅपच्या कोड टाकून व्यवस्थित भरा. त्यानंतर click here to continue वर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल ज्यामध्ये आधार कार्ड नंबर, बँक खाता नंबर, जमिनीचा खाते नंबर, गट नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
- तुमच्या जमिनी बद्दलची सर्व माहिती व्यवस्थित टाका ही माहिती राज्य सरकारच्या भूलेख रेकॉर्डमध्ये जुळली पाहिजे.
- आवश्यक असल्यास तुमच्या आधार कार्ड बँक पासबुक आणि जमिनीसंबंधीची कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व माहिती भरल्यानंतर एकदा व्यवस्थित चेक करा आणि सबमिट करा.
- सफलतापूर्वक फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल तो तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल.
PM Kisan Samman Nidhi Yojana लाभार्थीची स्थिती कशी चेक करावी?
- पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- किसन कॉर्नर अंतर्गत लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.
- त्यानंतर शेतकऱ्याने स्वतःचा आधार नंबर किंवा खाता क्रमांक टाका.
- आता तुमच्यासमोर तुमच्या योजनेची स्थिती दिसेल.
पी एम किसान योजनेसाठी इ-केवायसी प्रक्रिया कशी करावी?
- पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- किसान कॉर्नर वर जा.
- मोबाईल नंबर टाका.
- आधार नंबर टाका.
- ओटीपी सत्यपीत करा.
FAQS
PM Kisan Samman Nidhi Yojana काय आहे?
भारतातील शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधी योजना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे चालू केली गेली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये डीबीटी अंतर्गत दरवर्षाला तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये ट्रान्सफर केले जाते. 24 फेब्रुवारी 2019 ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे पी एम किसान योजना गोरखपुर मध्ये पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता ट्रान्सफर केला होता. या योजनेचे बजेट 75 करोड आहे.
PM Kisan Samman Nidhi Yojana आवश्यक कागदपत्रे काय आहे?
जर तुम्ही पण आत्तापर्यंत योजनेचा लाभ घेऊ शकले नाही आणि या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करू इच्छित असाल तर तुमच्याकडे काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे असणे आवश्यक आहे. जसे की बँक अकाउंट, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, मोबाईल नंबर, इत्यादी.
PM Kisan Samman Nidhi Yojana Status कसे चेक करावे?
पीएम किसान लाभार्थी स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर त्यामध्ये फार्मर्स कॉर्नर मध्ये know your status या पर्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला स्टेटस च्या पेजवर पाठवले जाईल. तिथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅपचा टाकून Get Data या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि तुमचे स्टेटस चेक करायचे आहे.