PM yashasvi Yojana 2025:
पीएम यशस्वी योजना ही एक अशी योजना आहे जी सरकारद्वारे चालवली जाते, या योजने अंतर्गत वर्ग 9 पासून तर ग्रॅजुएशन पर्यंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. या योजनेमध्ये तुम्हाला 1.25 लाख रुपये पर्यंत स्कॉलरशिप दिली जाते आणि पायलट जशा कोर्स साठी 3.72 लाख रुपये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाते.
PM yashasvi Yojana 2025 ही योजना अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे अभ्यासामध्ये हुशार आहेत परंतु आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे ते त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यामध्ये त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. केंद्र सरकार द्वारे अनेक लाभदायी योजना वेळोवेळी राबवल्या जात आहेत आणि त्यामध्ये तुमच्यासाठी आम्ही पीएम यशस्वी योजनेबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. ही योजना आर्थिक परिस्थितीने दुर्बळ असलेल्या मुलांसाठी राबवली जात आहे ज्यामध्ये विद्यार्थी अर्ज करून त्यांच्या शिक्षणांमध्ये येणाऱ्या अडचणी कमी करू शकतात. या स्कॉलरशिप अंतर्गत नववी पासून तर पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत तुमच्या कोर्स प्रमाणे तुम्ही स्कॉलरशिप प्राप्त करू शकता.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना केवळ स्कॉलरशिप दिली जाणार नसून तर त्यांच्या स्कूल किंवा कॉलेजची फी साठी दोन लाख दिले जातील आणि फी बरोबर लॅपटॉपची सुविधा पण दिली जाईल. जर तुम्ही पण या लाभकारी योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल आणि अर्ज करू इच्छित असाल तर या योजनेत संबंधी ची पात्रता व खर्च प्रक्रिया याबद्दल संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिली आहे, ती तुम्ही सविस्तरपणे वाचू शकता.
PM yashasvi Yojana 2025 काय आहे?
PM yashasvi Yojana 2025 ही योजना वर्ग नववी ते पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांसाठी राबवली जात आहे, ज्यामध्ये 1.25 लाख पर्यंत स्कॉलरशिप दिली जाते आणि पायलट अशा कोर्ससाठी 3.72 लाख रुपये पर्यंत ची आर्थिक मदत दिली जाते. त्याचबरोबर या योजनेमध्ये पाच कंपोनंट आहे, ज्यामध्ये टॉप क्लास स्कूल एज्युकेशन स्कीम, प्री मॅट्रिक स्कॉलरशिप, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, टॉप क्लास कॉलेज एज्युकेशन स्कीम व मुलामुलींसाठी होस्टेल अशा स्कीम सहभागी आहेत, त्यामध्ये प्रत्येक स्तरावर वेगळ्या पद्धतीने आर्थिक मदत केली जाते आणि आज आम्ही तुम्हाला टॉप क्लास एज्युकेशन बद्दल माहिती सांगणार आहोत त्यामध्ये 1.50 लाख रुपये पर्यंत ची स्कॉलरशिप दिली जाते.
या योजनेअंतर्गत सरकार त्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मेहनत करत आहेत. परंतु आर्थिक समस्यांमुळे ते सफल होत नाहीत. या योजनेसाठी सहा करोड रुपयांचे बजेट काढले आहे, परंतु केंद्र सरकारने ते वाढवून 7200 करोड रुपये केले आहे. या योजनेमध्ये राज्य सरकारचे 40% हिस्सेदारी असेल व 60% रक्कम केंद्र सरकार द्वारे उपलब्ध केली जाईल. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक रूपाने मागासलेल्या विद्यार्थ्यांना स्वप्न साकार करण्यासाठी भारत सरकारची हे एक उत्तम कामगिरी आहे.
Widow Pension Scheme: विधवा महिलांना मिळणार सरकारकडून दर महिन्याला 3000 रुपये
PM yashasvi Yojana 2025 पात्रता:
- अर्ज करणारा व्यक्ती हा भारताचा नागरिक असावा.
- अर्ज करणार विद्यार्थी हा ओबीसी, ईबीसी किंवा डी एन टी कॅटेगिरी चा असावा.
- अर्ज करताना अर्जदाराने याआधी इतर कोणत्याही स्कॉलरशिप चा लाभ घेतलेला नसावा.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी आई-वडिलांना केवळ दोनच अपत्य असावे.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावे.
- अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला नसावा.
टॉप क्लास स्कूल एज्युकेशन मध्ये मिळणार इतके रुपये:
टॉप क्लास स्कूल एज्युकेशन स्कीम मध्ये नववी किंवा दहावीच्या विद्यार्थ्यांना 75 हजार पर्यंत स्कॉलरशिप दिली जाते आणि अकरावी किंवा बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 1.25 लाख रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप दिली जाते.
टॉप क्लास कॉलेज एज्युकेशन मध्ये मिळणार इतके रुपये:
प्रायव्हेट संस्थांसाठी दोन लाख पर्यंत ची ट्युशन फी मिळते आणि पायलटच्या ट्रेनिंग साठी जर विद्यार्थी प्रायव्हेट फ्लाईंग क्लब मध्ये जात असेल तर त्या 3.72 लाखापर्यंतचे रुपये सरकारतर्फे दिले जाते, त्याचबरोबर 3000 रुपये महिन्याला राहण्यासाठी व खाण्यासाठी 5000 पर्यंत स्टेशनरी दिली जाते, त्याचबरोबर लॅपटॉप व कम्प्युटर साठी विद्यार्थ्यांना 45000 रुपये मदत दिली जाते.
PM yashasvi Yojana 2025 आवश्यक कागदपत्रे:
जर तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करू इच्छित असाल तर तुमच्याकडे खालील प्रमाणे कागदपत्रे असणे गरजेचे आहे:
- आधार कार्ड
- आय प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक योग्यतेसाठी मार्कशीट
- पासपोर्ट साईज फोटो
- जात प्रमाणपत्र
- विकलांगता प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- बँक पासबुक
PM yashasvi Yojana 2025 अर्ज प्रक्रिया कशी करावी?
पीएम यशस्वी योजनेसाठी आँनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टींचे पालन करा:
- पीएम यशस्वी स्कॉलरशिपच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईटवर गेल्यानंतर new candidate register here यावर क्लिक करा.
- त्यात तुमचे नाव, वर्ग, ईमेल आयडी, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख, पासवर्ड आणि इतर आवश्यक माहिती भरा आणि ओटीपी टाकून सत्यापित करा.
- त्यानंतर पीएम यशस्वी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करा.
- तुमची शैक्षणिक योग्यता आणि परीक्षा केंद्राचा पर्याय टाका व अर्जाचा फॉर्म व्यवस्थित भरा.
- तुमचा फोटो, सही, आय प्रमाणपत्र, श्रेणी प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्जाचा फॉर्म व्यवस्थित तपासून जमा करा आणि प्रिंट आऊट घ्या.
PM yashasvi Yojana 2025: FAQS
- PM yashasvi Yojana 2025 साठी पात्र कोण आहे?
ओबीसी, ईबीसी व डी एन टी श्रेणीतील विद्यार्थ्यांना जे सरकारी शाळेमध्ये वर्ग नववी व वर्ग बारावी मध्ये शिकत आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे. - यशस्वी योजनेअंतर्गत मला किती शिष्यवृत्ती मिळू शकते?
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ही त्याच्या शिक्षणाच्या स्तरावर आधारित असते, त्याबद्दल सविस्तर माहिती या पोस्टमध्ये दिली आहे.