MPSC Group B Bharti 2025 : सरकारी नोकरीसाठी 282 पदांची भरती सुरू!

MPSC Group B Bharti 2025:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2025 मधील गट ब सेवा भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. संयुक्त पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार असून एकूण 282 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्यकर निरीक्षक पदांसाठी अर्ज 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MPSC Group B Bharti 2025 Notification Out :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2025 मध्ये गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची घोषणा केली आहे. ही परीक्षा रविवार 9 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील 34 केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेद्वारे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील एकूण 282 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 या निघालेल्या जाहिरातीनुसार 1 ऑगस्ट पासून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 असणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट व राजपत्रित पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार असून या परीक्षेद्वारे सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या 3 जागा आणि राज्यकर निरीक्षक या पदासाठी 279 जागा अशा एकूण 282 जागा भरण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. या अर्जाची लिंक बातमीमध्ये दिली आहे. त्या लिंक वर जाऊन इच्छुक उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

282 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू(MPSC Group B Bharti 2025):

आयोगाने काढलेल्या जाहिरातीनुसार 282 रिक्त जागांपैकी सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब च्या 3 जागा आहेत तर राज्यकर निरीक्षक च्या 279 जागा आहेत. आरक्षणा नुसार जागांची वर्गीकरण केले आहे. मुख्य परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल. जाहिराती मध्ये नमूद केले आहे की पदांची संख्या आणि आरक्षण संबंधित सरकारी विभागांच्या निर्देशानुसार बदलू शकते.

हे पण वाचा : Solar Pump Yojana List: सोलर पंप योजना लाभार्थी सूची जाहीर! अशा पद्धतीने तपासा यादी!

पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी (MPSC Group B Bharti 2025):

  • पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.
  • प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गांपैकी जाहिरातीच्या दिनांक पर्यंत प्राप्त झालेली पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केली आहे. जाहिराती मध्ये नमूद संवर्गातील पदांव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या राहिलेल्या पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षा निकाल अंतिम कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारे सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. व अशा सुधारित मागणी पत्रांचा तपशील पूर्व परीक्षेच्या निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच्या आधारे परीक्षा मधून भरावयाच्या पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल.

MPSC Group B Bharti 2025 आरक्षणाच्या लाभासाठी कागदपत्रे आवश्यक:

जाहिरातीत स्पष्टपणे नमूद केले आहे की पदांची संख्या आणि आरक्षण संबंधित सरकारी विभागांकडून प्राप्त माहितीनुसार बदलू शकते. उमेदवारांना पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यास प्रोत्साहित केले जाते. कारण पदांच्या संख्येत बदल आणि सामाजिक व समांतर आरक्षण श्रेणीच्या उपलब्धतेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ज्या उमेदवारांनी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला आहे, त्यांनी अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

MPSC Group B Bharti 2025 खेळाडू अपंग आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती:

खेळाडूंसाठीच्या आरक्षण धोरणाचे तपशील दिले आहेत त्यात संबंधित सरकारी नियमांचा संदर्भ आहे. क्रीडा प्रमाणपत्राची वैधता तपासणी करणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षण ‘दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम’,2016 आणि संबंधित सरकार नियमानुसारच असेल. सहाय्यक कक्षा अधिकारी आणि राज्यकर निरीक्षण यांसारख्या विशिष्ट पदांसाठी कोणत्या प्रकारच्या अपंगत्वाचा समावेश होतो हे दिले आहे. अनाथ उमेदवारांसाठीच्या आरक्षणाचे तपशील दिले आहेत, त्यात संबंधित सरकार नियमांचा संदर्भ आहे. एका अनाथ श्रेणीतील उमेदवार उपलब्ध नसल्यास रिक्त जागा कशा भरायच्या, याची माहिती सुद्धा दिली आहे. उमेदवार भारतीय नागरिक असावा आणि प्रत्येक पदासाठी विहित केलेले वय आणि शैक्षणिक पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने समक्ष मांडलेली अहर्ता आवश्यक आहे.

MPSC Group B Bharti 2025 परीक्षा पद्धत:

निवड प्रक्रिया पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन मुख्य टप्प्यात होईल. पूर्व आणि मुख्य परीक्षेचे वेटेज प्रत्येक पदासाठी निश्चित केले आहे. पूर्व परीक्षेत कट ऑफ गुण मिळवणारे उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र असतील. मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज आणि फी आवश्यक असेल. उमेदवारांना एमपीएससीच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणी करून प्रोफाइल तयार करणे आवश्यक आहे. ज्यांनी आधीच नोंदणी प्रक्रिया केली आहे त्यांनी आवश्यक असल्यास त्यांची प्रोफाइल अपडेट करावी.

 

Leave a Comment